Question
टिपा लिहा.

अजस्र कडा

Answer

  1. क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने अजस्र कडा हा ब्राझीलमधील सर्वांत लहान प्राकृतिक विभाग आहे.
  2. सावो पावलो ते पोत्तो ॲलेग्रेच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सरळ एका उतारात संपते. त्यामुळे कड्यासारखा प्राकृतिक भाग तयार होतो. ब्राझील उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या अजस्र कड्यामुळे अंकित होते. अजस्र कड्याच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची ७९० मीटर इतकी आहे. काही भागांत ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते.
  3. अजस्र कड्याचा ब्राझीलमधील हवामानावर परिणाम होतो.
  4. अजस्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने अधिक पाऊस पडतो.
  5. अजस्र कड्याच्या पलीकडे ब्राझीलमधील ईशान्य भागात वातविन्मुख प्रदेश (पर्जन्यछायेचा प्रदेश) आढळतो. हा भाग 'अवर्षण चतुष्कोन' म्हणून ओळखला जातो.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions