Question
उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो?

Answer

इतिहास द्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी पुढीलप्रमाणे सहसंबंध असतो
  1. भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो.
  2. आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा यांबद्दल त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशाचा इतिहास पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानातील मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते.
  3. उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते.
  4. उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमानकाळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
(अ) विज्ञान (ब) कला (क) व्यवस्थापनशास्त्र
भारतामध्ये नदयांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?
थोडक्यात उत्तरे दया.

क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा.

भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
संकल्पनाचित्र तयार करा.
  वर्तमानपत्रे आकाशवाणी दूरदर्शन
सुरुवात/ पार्श्वभूमी      
माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूप      
कार्ये      
अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत?
भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणांसह स्पष्ट करा.
पँटानल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत?
नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात?
इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान १० उपाय सुचवा.