Questions

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा : [पद्य] [8M]

Take a timed test

4 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 18 Marks
$1.$आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :

$(i)$ अधिकार आहे तो $-$__________
$(ii)$ मातीचे मंगलमय व्हावे$-$__________
$(iii)$ याचा ललकार घुमवू या$-$__________
$(iv)$ नौबत याची झडते आहे$-$__________या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार ।।
फुलामुलांतून हसतो श्रावण
मातीचे हो मंगल तनमन
चैतन्याचे फिरे सुदर्शन
शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार ।।
या हातांनी यंत्र डोलते
श्रमशक्तीचे मंत्र बोलते
उद्योगाचे चक्र चालते
आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार ।।
हजार आम्ही एकी बळकट
सर्वांचे हो एकच मनगट
शक्तीचीही झडते नौबत
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार ।।
या विश्वाची विभव संपदा
जपू वाढवू आम्ही लाखदा
हस्त शुभंकर हवा एकदा
भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार ।।
$2.$ आकलन कृती :
(१) पुढील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा :

$(i)$ हआभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार - ____________
$3.$ व्याकरण :  
(१) पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा :

$(i)$ आमाव्ळावर $\rightarrow$ _______________$,$_______________$,$_______________$,$_______________​​​​​​​
$4.$ स्वमत कृत्ती :
शेतामधून पिकवू मोती, धन हे अपरंपार' या ओळीतून व्यक्त झालेले विचारसौदर्य (सूचित होणारा अर्थ) स्पष्ट करा.
Answer
$1.$ आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :

$(i)$ देशाच्या मातीवर
$(ii)$ तनमन
$(iii)$ उत्क्रांतीचा
$(iv)$ शक्तीची
$2.$ आकलन कृती :
(१) पुढील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा :

$(i)$ उत्क्रांती म्हणजे हळूहळू झालेला योग्य बदल. आपला देश प्रगती पथावर नेण्यासाठी सुयोग्य मूल्ये रुजवणे व जोपासणे आवश्यक आहे. मूल्यात्मक बदलाचा बुलंद घोप आभाळापर्यंत जाऊ दया, असे कवींना म्हणायचे आहे.
$3.$ व्याकरण :  
(१) पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा :

$(i)$ आमाव्ळावर$\rightarrow $आव, आर, वर,भाव
$4.$ स्वमत कृत्ती :
'स्वप्न करू साकार' या कवितेमध्ये कवी किशोर पाठक यांनी नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणती मूल्ये जपावी लागतील हे सांगताना ही ओळ लिहिली आहे.
मातृभूमीवर आपला अधिकार आहे असे सांगताना कवी पुढे म्हणतात की, आपली माती आपल्याला पोसते. ऋषिसंस्कृती अबाधित राहण्यासाठी शेतामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्यांची श्रमप्रतिष्ठा राखली पाहिजे. शेतामधून मोत्यांसारखे येणारे पीक हीच आपली धनदौलत आहे. ती अमाप होण्यासाठी कष्टकऱ्यांना हातभार लावणे हे आपले कर्तव्य आहे. नव्या युगाचे व नवीन पिढीचे स्वप्न यातूनच साकार होईल.
माणसाच्या जीवनात मातीला किती मोल आहे, याची जाणीव करून देणारी ही पंक्ती आहे.
View full question & answer
Question 28 Marks
$1.$आकलन कृती :
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा :

$(i)$ घराघरातून कोण जन्मणार आहे?
$(ii)$ कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे?
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार ।।
फुलामुलांतून हसतो श्रावण
मातीचे हो मंगल तनमन
चैतन्याचे फिरे सुदर्शन
शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार ।।
या हातांनी यंत्र डोलते
श्रमशक्तीचे मंत्र बोलते
उद्योगाचे चक्र चालते
आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार ।।
हजार आम्ही एकी बळकट
सर्वांचे हो एकच मनगट
शक्तीचीही झडते नौबत
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार ।।
या विश्वाची विभव संपदा
जपू वाढवू आम्ही लाखदा
हस्त शुभंकर हवा एकदा
भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार ।।
$2.$ आकलन कृती :
(१) पुढील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा :

$(i)$ हस्त शुभंकर $-$ ______________
$3.$ व्याकरण :  
(१) अचूक शब्द लिहा :

$(i)$ भवर्वाष्य, भविश्य, भविष्य, भाविष्य
$(ii)$ उज्वल, उज्ज्वल, कन्चल, ऊज्ज्वल
$(iii)$ श्रावण, श्रावण, श्रावन, श्रावण
$(iv)$ चेतन्य, चेतण्य, चैतष्य, चैतन्य
$4.$ स्वमत कृत्ती :
या कवितेत कवीने वघितलेले स्वप्न तुमच्या शब्दांत लिहा.
Answer
$1.$आकलन कृती :
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा :

$(i)$ घराघरांतून नवीन बालकांच्या रूपात तेजाचा अवतार जन्म घेणार आहे.
$(ii)$ नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार करायचे आहे.
$2.$ आकलन कृती :
(१) पुढील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा :

$(i)$ हस्त म्हणजे हात हे कर्तृत्वाचे प्रतीक आहे. हजारो हात हातात गुंफले की कार्य सहजतेने पार पाडले जाते. शुभंकर म्हणजे पवित्र. देशकार्य करण्यासाठी पवित्र, मंगलमय हातांची गरज आहे.
$3.$ व्याकरण :  
(१) अचूक शब्द लिहा :

$(i)$ भविष्य
$(ii)$ उज्ज्वल
$(iii)$ श्रावण
$(iv)$ चैतन्य
$4.$ स्वमत कृत्ती :
नवीन पिढीचे व नवीन युगाचे स्वप्न कसे साकार करायचे याचे मार्गदर्शन करताना कवी म्हणतात. आपली मातृभूमी आपल्याला अत्यंत प्रिय आहे. या मातीवर आपला अधिकार आहे. त्यामुळे मातीचे मन आणि तन प्रसन्न राखण्यासाठी शेतामधून मोती पिकवायला हवेत. आपले हेच अपरंपार धन आहे. कृषिसंस्कृती जपणे व संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. उदयोगपंदे निर्माण करण्यासाठी श्रमशक्तीच्या मंत्राने यंत्र चालवायला हवीत आणि आभाळात उत्क्रांतीची ललकारी घुमवायला हवी. हजारो हातांचे एक मनगट करून एकतेची नौबत झडायला हवी. घराघरांतून जन्म घेणाऱ्या तेजाच्या अवताराला ही एकजूट बघायला मिळायला हवी. जगातील वैभव जपण्यासाठी पवित्र हातांचे योगदान दयायला हवे. या सर्व गोष्टींमुळे आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल होईल. ऋषिप्रधानता, श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांची शिकवण देऊन कवी उदघाचे स्वप्न साकार करीत आहे.
View full question & answer
Question 38 Marks
$1.$आकलन कृती :
(१) आकृतिबंध पूर्ण करा :

$(i)$Imageया देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार ।।
फुलामुलांतून हसतो श्रावण
मातीचे हो मंगल तनमन
चैतन्याचे फिरे सुदर्शन
शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार ।।
या हातांनी यंत्र डोलते
श्रमशक्तीचे मंत्र बोलते
उद्योगाचे चक्र चालते
आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार ।।
हजार आम्ही एकी बळकट
सर्वांचे हो एकच मनगट
शक्तीचीही झडते नौबत
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार ।।
या विश्वाची विभव संपदा
जपू वाढवू आम्ही लाखदा
हस्त शुभंकर हवा एकदा
भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार ।।
$2.$ आकलन कृती :
(१) शब्दजाल पूर्ण करा :

$(i)$Image(२) पुढील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा :
$(i)$ श्रमशक्तीचे मंत्र $-$_____________
$3.$ व्याकरण :  
(१) पुढील कृती करा :

$(1)$ कमलदलासम लोचने प्रभु रामाची
$(i)$ उपमेय $\rightarrow $____________
$(ii)$ उपमान $\rightarrow $____________
$(iii)$ साधर्म्यवाचक शब्द $\rightarrow $____________
$(iv)$ समान गुण $\rightarrow $____________
$4.$ स्वमत कृत्ती :
'घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार' या ओळीचे भावसौंदर्य (सूचित होणारा अर्थ) स्पष्ट करा.
Answer
$1.$आकलन कृती :
(१) आकृतिबंध पूर्ण करा :

$(i)$Image$2.$आकलन कृती :
(१) शब्दजाल पूर्ण करा :

$(i)$Image (२) पुढील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा :
$(i)$ शेतात राबणारे शेतकरी, यंत्रांवर काम करणारे कामगार व कष्टकरी या श्रमशक्तीमुळे देशाची प्रगती होते. यालाच श्रमशक्तीचे मंत्र म्हटले आहे.
$3.$ व्याकरण :  
(१) पुढील कृती करा :

$(1)$ कमलदलासम लोचने प्रभु रामाची
$(i)$ प्रभु रामाचे डोळे
$(ii)$ कमलदल
$(iii)$ सम
$(iv)$ टपोरपणा (विशालत्व)
$4.$ स्वमत कृत्ती :
कवी किशोर पाठक यांनी 'स्वप्न करू साकार' या कवितेमध्ये उदद्याचा भारत सक्षम घडवण्यासाठी येणाऱ्या नवीन पिढीचे तेजोमय मूल्य अधोरेखित करताना प्रस्तुत ओळ लिहिली आहे. नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी काय नेमके करावे, हे सांगताना कवी म्हणतात, आपण सर्व अनेक धर्मपंथाचे असंख्य लोक असलो तरी आपली एकजूट महत्त्वाची आहे. आपल्या मनगटातील ताकद एकच आहेत. घराघरांतून जन्मलेले प्रत्येक बालक म्हणजे तेजाचा नवीन अवतार आहे. त्याच्या स्वागतासाठी एकजुटीच्या शक्तीची नौवत झडते आहे. राष्ट्रीय एकात्मता हे मूल्य व तेजः पुंज नवीन पिढी यांची सुयोग्य सांगड या ओळीत प्रकपनि जाणवते.
View full question & answer
Question 48 Marks
1.आकलन कृती :
(१) आकृतिबंध पूर्ण करा :
(i)
Image
(२) एका वाक्यात उत्तरे लिहा :
(i) कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे?

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार ।।

फुलामुलांतून हसतो श्रावण
मातीचे हो मंगल तनमन
चैतन्याचे फिरे सुदर्शन
शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार ।।

या हातांनी यंत्र डोलते
श्रमशक्तीचे मंत्र बोलते
उद्योगाचे चक्र चालते
आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार ।।

हजार आम्ही एकी बळकट
सर्वांचे हो एकच मनगट
शक्तीचीही झडते नौबत
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार ।।

या विश्वाची विभव संपदा
जपू वाढवू आम्ही लाखदा
हस्त शुभंकर हवा एकदा
भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार ।।

2. आकलन कृती :
(१)
शब्दजाल पूर्ण करा :
(i)
Image

3. व्याकरण :  
(१) पुढील कृती करा :
(1) सुरेखाचे शब्द भासे अक्षरमोती।
(i) उपमेय →____________
(ii) उपमान →____________
(iii) साधर्म्यवाचक शब्द →____________
(iv) समान गुण →____________

4. स्वमत कृत्ती :
'शेतामधून पिकवू मोती, धन हे अपरंपार' या ओळीतून व्यक्त झालेले विचारसौदर्य (सूचित होणारा अर्थ) स्पष्ट करा.

Answer
1.आकलन कृती :
(१) आकृतिबंध पूर्ण करा :
(i)
Image
(२) एका वाक्यात उत्तरे लिहा :
(i) नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार करायचे आहे.

2. आकलन कृती :
(१)
शब्दजाल पूर्ण करा :
(i)
Image

3. व्याकरण :  
(१) पुढील कृती करा :
(1) सुरेखाचे शब्द भासे अक्षरमोती।
(i) सुरेखाचे शब्द
(ii) मोती
(iii) भासे
(iv) सुंदरता

4. स्वमत कृत्ती :
'स्वप्न करू साकार' या कवितेमध्ये कवी किशोर पाठक यांनी नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणती मूल्ये जपावी लागतील हे सांगताना ही ओळ लिहिली आहे. मातृभूमीवर आपला अधिकार आहे असे सांगताना कवी पुढे म्हणतात की, आपली माती आपल्याला पोसते. ऋषिसंस्कृती अबाधित राहण्यासाठी शेतामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्यांची श्रमप्रतिष्ठा राखली पाहिजे. शेतामधून मोत्यांसारखे येणारे पीक हीच आपली धनदौलत आहे. ती अमाप होण्यासाठी कष्टकऱ्यांना हातभार लावणे हे आपले कर्तव्य आहे. नव्या युगाचे व नवीन पिढीचे स्वप्न यातूनच साकार होईल.

View full question & answer