(१) फक्त नावे लिहा.
(i) लोकमान्य टिळक यांचा आवडीचा विषय - ___________
(ii) संत तुलसीदासांनी यांचा त्याग केला - ___________
(iii) ध्येयाशी मैत्री करायची तर हे सोडावे लागते - ___________
(iv) धर्माच्या सेवेसाठी संभाजी महाराजांनी त्याग केला - ___________
कशासाठे काय सोडायचे हे ज्याला बरोबर कळते तोच खरा ध्येयवादी. तिथेच त्याचा खरा कस लागत असतो. 'मी आफ्रिकेत धर्मोपदेश करणार नाही. फक्त वैदयकीय मदतीचे काम करीन' असे वचन डॉ. खाइत्झर यांनी दिले होते. आणि पियानोची पेटी उघडून पाहायलाही त्यांना कित्येक दिवस सवड मिळाली नाही लोकमान्य टिळक नेहमी म्हणत असत, 'देशाच्या स्वातंत्र्याचा लढा मला लढायचा नसता तर मी गणिताचा प्राध्यापक होऊन राहिलो असतो.' गणित हा लोकमान्यांचा आवडता विषय. पण देशाच्या सेवेसाठी त्यांनी तो सोडून दिला ध्येयापुढे आवड बाजूला सारावी लागते. आवड म्हणजे तरी सुखच, ध्येयाशी मैत्री करावयाची तर सुखाची संगत सोडावीच लागणार. संत तुलसीदासांनी प्राणापलीकडे प्रेम असलेली पत्नी देवासाठी सोडली. देवाच्या सेवेसाठी पत्नीचा त्याग केला आणि धर्माच्या सेवेसाठी संभाजी महाराजांनी तर देहत्याग केला.
2. आकलन कृती :
(१) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य लिहा.
(i) फक्त वैद्यकीय मदतीचे काम करीन.
(ii) ध्येयापुढे आवड बाजूला सारावी लागते.