(१) सत्य किंवा असत्य लिहा :
(i) खऱ्या नात्यामध्ये संवेदना विभागलेली असते.
(ii) दुसऱ्या माणसांशी आपले नाते, ही महत्त्वाची गोष्ट आहे.
(iii) खऱ्या नात्यामधील संवेदना एकात्म असते.
(iv) बहुतेकजण नात्याचाबत गंभीर असतात.
दुसऱ्या माणसाशी असलेलं आपलं नातं ही खरंतर किती महत्त्वाची गोष्ट आहे. बहुतेकजण परस्परांमधल्या नात्याबाबत गंभीर नसतात, कारण ते आधी स्वतःचा विचार करतात आणि नंतर दुसऱ्याचा विचार करतात. दुसरे आपल्यासाठी सोयीचे असतील, सुख देणारे असतील किंवा आपल्या विचारभावनांना अवकाश देणारे असतील, तरच आपण त्यांना विचारात घेतो. बऱ्याचदा आपल्या दृष्टीने नातं ही एक अंतरावरील गोष्ट असते. आपण एखादधाशी नात्यानं जोडलेले आहोत म्हणजे त्यांच्यात गुंतलेलो आहोत, पूर्णपणे सामावले आहोत असा अनुभव म्हणूनच आपल्याला येत नाही. खऱ्या नात्यामध्ये संवेदना विखुरलेली, विभागलेली नसते, एकात्म असते. मात्र आपण नात्यात संवेदनेच्चे वेगवेगळे स्तर अनुभवतो.
2. एका वाक्यात लिहा :
(१) कारण लिहा :
बहुतेकजण परस्परांमधल्या नात्यांबाबत गंभीर नसतात; कारण
(२) योग्य पर्याय लिहा :
आपल्या दृष्टीने नाते ही एक
(i) सोईची गोष्ट असते.
(ii) विखुरलेली गोष्ट असते.
(iii) अंतरावरील गोष्ट असते
(iv) गुंतलेली गोष्ट असते.

