Question types

उपयोजित लेखन question types

21 questions across 6 question groups — pick any mix to generate a मराठी - कुमारभारती paper with step-by-step answer keys.

21
Questions
6
Question groups
5
Question types
Sample Questions

उपयोजित लेखन questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

शालेय भांडार प्रमुख या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी मागवलेल्या पुस्तकांवर अधिक सवलत देण्याविषयी विनंती करणारे पत्र लिहा.
Image
View full solution
      थकणे ही एक शारीरिक अवस्था आहे. थोडी विश्रांती घेतल्यानंतर थकवा जातो. वेगाने चालणाऱ्या व्यक्तीला झाडाच्या सावलीत थांबल्यानंतर प्राणवायूचा लाभ थोडा अधिक होतो व त्याचा थकवा लवकर कमी होतो. प्रत्येक इंद्रियाला मूलभूत शक्ती असते व त्या शक्तीला मर्यादा असते. ती शक्ती ओलांडली म्हणजे थकवा येतो. त्या इंद्रियांना अल्पकाळ विश्रांती मिळाली की बरे वाटते. कंटाळा ही मानसिक अवस्था असते. ते आळसाचेच एक रूप असते. एक प्रकारची जडता, शिथिलता किंवा मंदपणा हे आळसाचे लक्षण असते. आळस हा वृत्तीत रूपांतरित होऊ शकतो. काही व्यक्ती वृत्तीने आळशी असतात. त्यांना कामाचा कंटाळा असतो. ती नाना प्रकारच्या सबबी सांगून कामे टाळतात. हा कंटाळा स्वाभाविक असतो, जेव्हा कामच कंटाळवाणे, रूक्ष, रसहीन व अर्थशून्य असते. लहान मुलांना खेळाचा कंटाळा येत नाही. पण इतर कामांचा कंटाळा येतो. कंटाळा माणसाच्या वृत्तीत असतो; तर थकवा गात्रात असतो. थकवा दूर होऊ शकतो पण कंटाळा ही खोड होण्याचा संभव असतो. थकवा किंवा कंटाळा या दोहोंचा एक परिणाम मात्र समान असतो. त्यामुळे हाती घेतलेल्या कामाची प्रत खालावते. अंगचा आळस जाण्यासाठी आणि कर्तृत्वाचा कळस गाठण्यासाठी शरीर-मनाचे आरोग्य व ताजेपणा जतन करावे.
View full solution
     वर्षाऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणावलेल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताहेत. वृक्ष- पणर्णांनी अंग धरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चालले आहे. कुठे काठाला भिडले आहे, कुठे काठावर चढले आहे, कुठे संथ-गंभीर राहून दबदबा दाखवत आहे. भव्य, स्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी समजूतदार वाटते, शहाण्यासारखे वागते; पण तेच पुढे जाऊन काठावरची गरीब बिचारी खोपटी उध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर, अडाणी आणि उ‌द्दाम वाटते. पुढे जाता जाता कुठे झाडावर चढते, कुठे गच्चीवर लोळते, कुठे घाट बुडवते, तर कुठे वाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एवढे उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते. पाणी किती शहाणे असते! जोवर कोणी अडवत नाही, शेतमळे, बागा फुलवत नाही, रान-रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावे? दरवर्षी वर्षाऋतूत यावे अन् वाहून जावे. पाण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावे, फुलवत - खुलवत, पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेल? पण पाण्याचे मन कोण जाणणार ?

-राजा मंगळवेढेकर

View full solution
शाळेचा शताब्दी वर्ष सांगता समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न
View full solution
मुद्दे : मोरू कोळ्याचे पोर - बापाची समुद्रकिनारी वाट पाहणे - समुद्राची कृपा - उदरनिर्वाहाचे साधन - पूजा करून कृतज्ञता व्यक्त - समुद्रात हरवलेला बाप होडक्यात दिसणे - मुलाची बापाशी गळाभेट.
View full solution
     आम्ही मनातल्या मनात चरकलोच. मुलीकडचे किंवा मुलाकडचे कोणीतरी येतील, चौकशी करतील, असे वाटत होते. पण बराच वेळ कोणीच येईना. मुलाकडच्यांना वाटत होते, 'हे मुलीकडचे पाहुणे असणार.' तर मुलीकडच्यांना वाटत होते, 'हे मुलाकडचे पाहुणे असणार! असे होता होता आमची स्थिती मात्र ना घरका, ना घाटका अशी झाली होती. आम्ही सोडून सर्व लोक आनंदात वावरत होते. हसत खिदळत होते, जेवून येत होते. आइस्क्रीम खात होते. जेवणाची तारीफ करीत होते. आम्ही भर दुपारी उन्हातान्हातून आलो होतो. तहानेने जीव व्याकूळ झाला होता. पोटात कावळे ओरडत होते. आम्हांला हे सर्व असह्य झाले. आम्ही चोरासारखे गुपचूप उठलो. बाईकवर बसलो आणि भुर्रकन दूर पळालो.
     त्या दिवसापासून पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आम्ही कुठेही जात नाही.

( संदर्भ: भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण महाराष्ट्र,
पोवारी : हरिश्चंद्र बोरकर, पृष्ठ क्र. १५८)

View full solution
पुढील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा आणि तुम्ही पूर्ण केलेल्या कथेला योग्य शीर्षक ट्या :
कथेचा पूर्वार्ध :
   आम्हांला उन्हाळी सुट्टी लागणार, म्हणून मी व माझी धाकटी बहीण सानिका खूप खूश होतो. त्याला कारणही तसेच होते. बाबांनी सुट्टीत आम्हांला महाबळेश्वरला नेण्याचे कबूल केले होते. १० मे ते १५ मे अशी सहलीची तारीखही नक्की ठरली होती. मी सहलीच्या आनंदात रंगून गेलो होतो. "वैभवदादा, कॅमेरा बरोबर घ्यायचा का?" सानिकाच्या या प्रश्नाने मी भानावरआलो. "अग हो, घेऊया," म्हणून मी पुन्हा तयारीला लागलो. बरोबर नेण्याच्या वस्तू एकत्रित करणे, महाबळेश्वरची भौगोलिक माहिती आंतरजालावरून मिळवणे सुरू झाले. आमचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. बघता बघता १० मे ची पहाट उजाडली. आई, बाबा, मी, सानिका सर्व तयार झालो. आवराआवर झाली. सगळे निघणार एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि
कथेचा उत्तरार्ध :
View full solution
(१) दिलेले शब्द नीट वाचा.
(२) त्यातील परस्परसंबंध समजून घ्या.
(३) शब्दांत दडलेली गोष्ट मनातल्या मनात तयार करा.
(४) शब्दांच्या आधारे समर्पक गोष्ट थोडक्यात लिहा.
(५) योग्य शीर्षक व तात्पर्य लिहा.
View full solution
(१) शीर्षकाचा मथितार्थ समजून घ्या.
(२) शीर्षकाच्या अर्थाला समर्पक कथा लिहा.
(३) कथा शीर्षकातच दडलेली आहे; त्याचा शोध घ्या.
(४) थोडक्यात साध्या, सोप्या शब्दांत कथा लिहा.
View full solution

Generate a उपयोजित लेखन paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App