Questions

[2 Marks Questions]

Take a timed test

5 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 12 Marks
भौगोलिक कारणे लिहा.

गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे.

Answer
  1. भारतातील उत्तर भागात गंगा नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश आहे.
  2. गंगा नदीच्या खोऱ्यात पुरेसे पर्जन्यमान, सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता, सौम्य हवामान इत्यादी अनुकूल घटक आढळतात.
  3. गंगा खोऱ्याचा प्रदेश शेती व विविध उदयोगांच्या विकासासाठी अनुकूल आहे. या प्रदेशात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले आहे. त्यामुळे गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट आहे.
View full question & answer
Question 22 Marks
भौगोलिक कारणे लिहा.

ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.

Answer
  1. ब्राझील देशाच्या उत्तर भागात विषुववृत्ताजवळील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे २००० मिमी असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे २८° से असते.
  2. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या भागात अत्यंत घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात. जास्त पर्जन्यमान, उष्ण व दमट हवामान आणि घनदाट वर्षावने या प्रतिकूल घटकांमुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग दुर्गम बनला आहे.
  3. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले नाही. त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.
View full question & answer
Question 32 Marks
भौगोलिक कारणे लिहा.

भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.

Answer
  1. पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ २.४१ टक्के भूभाग भारताने व्यापला आहे.
  2. याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १७.५ टक्के लोकसंख्या भारतात आढळते.
  3. भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.
View full question & answer
Question 42 Marks
भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.

Answer
  1. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील जगात पाचव्या क्रमांकावर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार ब्राझीलची लोकसंख्या सुमारे १९ कोटी असून लोकसंख्येच्या दृष्टीनेही हा देश जगात पाचव्या क्रमांकावर आहे.
  2. पृथ्वीच्या भूभागापैकी ५.६% भाग ब्राझील व्यापतो. त्यावर जगाच्या लोकसंख्येपैकी फक्त २.७% लोकसंख्या वास्तव्यास आहे.
  3. ब्राझीलमध्ये लोकसंख्यावाढीचा दरदेखील कमी होताना दिसून येतो, म्हणून लोकसंख्या वाढ नियंत्रणात आहे.
    या सर्व कारणांमुळेच ब्राझीलचे आकारमान जास्त असले तरीही तेथील लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे. २०१० च्या जनगणनेनुसार ब्राझीलमध्ये लोकसंख्येची सरासरी घनता २३ व्यक्ती प्रति चौकिमी इतकी आहे.
View full question & answer
Question 52 Marks
भौगोलिक कारणे लिहा.

लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.

Answer
  1. कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो.
  2. एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संथ गतीने होतो.
  3. एखादया देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास जलद गतीने होतो. अशा प्रकारे, लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.
View full question & answer