Questions

[4 Marks Questions]

Take a timed test

4 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 14 Marks

खालील दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून पुढील मुद्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा:

Image

(अ) निसर्गाचे चित्रण
(ब) मानवाकृतींचे रेखाटन
(क) व्यवसाय
(ड) घरे.

Answer

वारली चित्र परंपरेतील चित्र आहे. वारली चित्रकला- शैलीचा उदय ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातीत झाला. या चित्र विषयी माहिती-

() निसर्गाचे चित्रण:
या चित्रात काही वनस्पतींच्या फांदया, फुलझाडे, उगवता सूर्य, पक्षी यांची चित्रे रेखाटलेली दिसतात.

() मानवाकृतींचे रेखाटन:
चित्रात स्त्री-पुरुष, खेळणारी मुले यांची चित्रे रेखाटलेली दिसतात. वारली चित्र माणसांची हुबेहूब चित्र नसतात. ती फक्त रेखाचित्रे असतात. त्रिकोण, चौकोन व वर्तुळ यांच्या साहाय्याने मानवाकृती रेखाटल्या जातात.

() व्यवसाय:
या चित्रात शेती करणारे स्त्री-पुरुष दिसत आहेत.
पशुपालन हाही या लोकांचा व्यवसाय असावा.

() घरे:
उतरत्या छपरांच्या झोपड्या चित्रात दिसतात. झोपड्यांच्या भिंती कुडांच्या किंवा मातीच्या असाव्यात. त्यावर चित्रे काढलेली आहेत.
या चित्रातून वारली समाजजीवन व्यक्त होते. हे लोक गरीब आहेत, हे जाणवते. हे लोक जसे जगतात, त्याच परिसरातील व अनुभवातील मानवी व निसर्ग घटकांचे आकार ते रेखाटताना दिसतात.

View full question & answer
Question 24 Marks
कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा
Answer
विविध कलाक्षेत्रांत व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात
  1. कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखागारे, ग्रंथालये, पुरातत्त्वीय संशोधन, पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात.
  2. औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी-विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते.
  3. चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य, कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाशयोजना इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते.
  4. मुद्रणक्षेत्रात तसेच घरसजावटीच्या साहित्यनिर्मितीत कला क्षेत्रातील जाणकारांची गरज असते.
  5. दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रांतही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात.
View full question & answer
Question 34 Marks
भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
Answer
पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लाम पूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्यशैलींतून विकसित झालेल्या स्थापत्यशैलीस 'मुस्लीम स्थापत्यशैली' असे म्हणतात. मध्ययुगीन भारतात मुस्लीम सत्तांच्या काळात विकसित झालेल्या या मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढीलप्रमाणे-
  1. या स्थापत्यशैलीत बांधलेला कुतुबमिनार जगातील सर्वाधिक उंच (२४० फूट) आहे.
  2. मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला ताजमहाल जगातील आठवे आश्चर्य मानले जाते.
  3. इसवी सनाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोलघुमट ही वास्तू प्रतिध्वनी साठी प्रसिद्ध आहे.
  4. फतेहपूर येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्याच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे.
  5. दिल्ली आणि आग्रा येथे बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत.
    वरील सर्व वास्तू मुस्लीम स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहेत.
View full question & answer
Question 44 Marks
लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.
Answer
  1. अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा चालू आहे. या गुहाचित्रांतून लोकचित्रशैलीचे जतन केले गेले.
  2. गुहाचित्रांमध्ये प्राणी, मनुष्याकृती, झाडे, शिकारीचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या भिंतींवर कोरलेली आढळतात.
  3. अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले. नवीन प्राणी, शेतीजीवन, वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले. मनुष्याकृतींच्या रेखाटनांच्या पद्धतीत व चित्रांमध्ये वापरल्या गेलेल्या रंगांमध्ये फरक होत गेला.
  4. नैसर्गिक द्रव्यांपासून, वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात. सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर करून मानव चित्रे कोरू लागला.
  5. नवाश्मयुगात विकसित झालेला मानव देव-देवतांची चित्रे काढू लागला. सणसमारंभप्रसंगी घरांच्या भिंतींवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरांतून लोकचित्रशैली विकसित झाली. वारली चित्र परंपरा, चित्रकथी परंपरा, लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात.
View full question & answer