Questions

[3 Marks Questions]

Take a timed test

3 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 13 Marks
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.

Answer
  1. दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्यासंबंधीची चलत्चित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय.
  2. सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ अशा जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात.
  3. आज दूरदर्शनवर १०० हून अधिक वाहिन्या उपलब्ध असून नॅशनल जिऑग्राफी, हिस्टरी, डिस्कव्हरी यांसारख्या वाहिन्यांद्वारे जगाचा इतिहास, भूगोल, अगदी घरबसल्या जाणून घेणे शक्य झाले आहे. शिवाय, विविध पौराणिक व ऐतिहासिक मालिकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
  4. खेळाडू, नेते, किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टींवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात. म्हणून सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
View full question & answer
Question 23 Marks
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.

Answer
  1. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. दिनविशेषसारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात.
  2. वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात.
  3. वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा ५०-७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते.
View full question & answer
Question 33 Marks
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते.

Answer
  1. प्रसारमाध्यमांद्वारे आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नसते.
  2. ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतू, सरकारी धोरण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते.
    प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह, दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात.
  3. जर्मनीतील 'स्टर्न साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिश्या प्रसिद्ध केल्या. पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले. म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते.
View full question & answer