| वर्तमानपत्रे | आकाशवाणी | दूरदर्शन | |
| सुरुवात/ पार्श्वभूमी | |||
| माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूप | |||
| कार्ये |
| वर्तमानपत्रे | आकाशवाणी | दूरदर्शन | |
| सुरुवात/ पार्श्वभूमी | जेम्स ऑगस्टस हिकी याने २९ जानेवारी १७८० रोजी 'बेंगॉल गॅझेट' हे इंग्रजी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोलकाता येथे सुरू केले. | १९२४ साली मद्रास (चेन्नई) येथे | १५ सप्टेंबर १९५९ रोजी भारतात प्रथम दिल्ली दूरदर्शन केंद्र सुरू झाले. |
| माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूप | मुख्यतः बातम्या, लेख, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, विविध सदरे असे वृत्तपत्रांचे स्वरूप असते. | विविध मनोरंजनपर, माहितीपर, प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर होतात. बातमीपत्रही असते. | जगभरच्या घटना, विविध मालिका, चित्रपट व गाणी, नैसर्गिक व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती, मुलाखती इत्यादी कार्यक्रम सादर होतात. |
| कार्ये | (१) दैनंदिन घटनांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे (२) लोकजागृती करणे व लोकशिक्षण (३) माहिती पुरवणे, लोकशाही बळकट करणे (४) अन्यायाला विरोध करून विकासात्मक कामांना प्रसिद्धी देणे. | (१) विविध क्षेत्रांतील बातम्या देणे (२) संगीत, गीत, नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमांद्वारे मनोरंजन करणे (३) कार्यक्रमांद्वारे सामाजिक समस्या मांडून लोकशिक्षण करणे (४) व्याख्यानांद्वारे, चर्चाद्वारे पर्यावरण - संस्कृती संवर्धन विषयक कार्यक्रम सादर करणे. | (१) मनोरंजन करणे, दैनंदिन घटना, माहिती प्रक्षेपित करणे (२) लोकशिक्षण करणे (३) समाजोपयोगी प्रसिद्धी देणे (४) सामाजिक समस्यांबाबत वाईट रूढी-परंपरा विरुद्ध समाज प्रबोधन करणे. |