Questions

उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा : [गद्य][7M]

Take a timed test

10 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 17 Marks
1. आकलन कृती 
(१) आकृत्या पूर्ण करा :
Image

    भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते. 'मोरांबा' या शब्दातल्या 'मोरा'चा मयूराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी (जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस) संबंध आहे. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात, ते त्यातून कळते.
    'कदर करणे' असे आपण म्हणतो. तो वाक्प्रचार आहे. 'कद्र' या अरबी शब्दापासून 'कदर' (म्हणजे गुणांची पारख) हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो, की आपल्या चुकाही होत नाहीत. उदा., 'अनुसया' असे नाव नसून ते 'अनसूया' असे आहे. 'अन् + असूया' अशी त्यातील संधी आहे. मनात असूया (मत्सर) नसलेली अशी ती 'अनसूया' हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसेच 'जराजर्जर' या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे, 'वार्धक्याने विकल झालेला!' यातील 'ज'चे उच्चार तालव्य (ज्य) आहेत. तर जरा (थोडे), जर (कलाबतू) या शब्दातील 'ज'चे उच्चार दन्तमूलीय आहेत. (दन्तमूलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी.) उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो.
      भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो, या साऱ्यांना महत्त्व असते. 'सूतकताई' हा शब्द जर 'सूतक ताई' असा लिहिला तर कसं वाटेल? तसंच 'अक्षरशः' हा शब्द लिहिताना 'अक्षर शहा' असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का?
    'पुराणातली वांगी पुराणात' या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे, हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल! तिथे मूळ म्हण होती 'पुराणातली वानगी पुराणात.' वानगी म्हणजे उदाहरणे. पण 'वानगी' झाली 'वांगी' आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी! अशी फजिती होते.
     काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात.
     उदाहरणार्थ,
     १. राजाचे 'कलेवर' प्रेम होते.
     २. अपघातस्थळी कडेला एक 'कलेवर' पडले होते.
     येथे पहिल्या वाक्यात 'कलेवर' हे शब्दरूप 'कला' या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे तर दुसऱ्या वाक्यात 'कलेवर' हे नाम असून त्याचा अर्थ 'शव' असा आहे.
     आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे.
     आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. उदा., आता पाऊस पडत आहे. 'पाऊस पडणे' या घटनेविषयी दोन वाक्यांतून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पाहा.
     १. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली.
     २. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या 'मॉर्निंग वॉक'च्या बेतावर पाणी पडले.
     अशी अनेक वाक्ये तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते, त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी.... असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू, हे विसरून चालणार नाही.

2. आकलन कृती
(१) लेखिकेच्या मते, भाषेवरील प्रेमासाठी पुढील कृती केल्या पाहिजेत :
(i) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(ii) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙

3. स्वमत :
'तुम्ही शहाणे आहात, या वाक्यातील 'शहाणे' या शब्दाच्या अर्थच्छटा लिहा.
Answer
1. आकलन कृती
(१) कृती करा :

(i) भाषेतली शक्तिस्थळे जाणून घेतली पाहिजेत.
(ii) भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा.

3. स्वमत :
तुम्ही शहाणे आहात,' असे अनेकदा म्हटले जाते. त्या वेळी ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर, त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो. आई आपल्या मुलाला, "बाळा, तू शहाणा आहेस" असे म्हणते, तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलाबद्दल विश्वास असतो.
मात्र प्रत्येक वेळेला 'तुम्ही शहाणे आहात, या वाक्याचा असा सरळ, प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच, असे नाही. काही व्यक्ती मुळातच लबाड असतात. चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात. कितीही समजावून सांगितले, तरी त्यांना ते समजून घ्यायचे नसते. मग त्यांना उपरोधाने 'तुम्ही शहाणे आहात, असे ऐकवावेलागते. येथे 'शहाणे हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात 'तुम्ही अतिशहाणे आहात, म्हणजे 'तुम्ही मूर्ख आहात,' असेच म्हणत असतो.
View full question & answer
Question 27 Marks
1. आकलन कृती 
(१) कृती करा :
(i) कधी कधी अर्थाचा गोंधळ होतो; कारण

    परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता.
    बायको : "तुम्हांला, मी उत्तप्पा बनवू का?"
    नवरा : "नको. मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादू‌गार!"
    आता इथे विनोद निर्माण झाला आहे. कारण 'बनवणे' हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत; पण हल्ली सगळे पदार्थ फक्त 'बनवले जातात. मराठीत 'बनवणे' म्हणजे 'फसवणे' असा अर्थ खरं तर रूढ आहे, त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस 'बनवणारा' जादू‌गार, विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला, तर आश्चर्य नाही.
मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत 'मारणे' हे एक क्रियापद घेतले, तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते, हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे, गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, (पोहताना) हातपाय मारणे, माश्या मारणे इत्यादी. 'मारणे' म्हणजे 'मार देणे' हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते.
शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार हीदेखील भाषेची खास शैली असते. 'खस्ता खाणे 'मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही, हे माहीत आहे ना? तसेच 'कंठस्नान घालणे' हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्ळ्याखालून 'अंघोळ घालणे', असा शब्दशः अर्थ नाही. 'खांदयाला खांदा लावणे' (सहकार्य करणे) आणि 'खांदा देणे' (प्रेताला खांदा देणे) यांतला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले, तर अर्थाचा अनर्थ होईल. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. 'अक्कलवान' म्हणजे हुशार; पण अकलेचा कांदा' म्हणजे 'अतिशहाणा' हे माहीत नसेल, तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय, हेच आपल्याला कळणार नाही.
    क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो, हे नीट माहीत नसले तरीदेखील अर्थाचा गोंधळ होतो. उदा., अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे (तिची चेष्टा करणे या अर्थी) आणि तिच्याशी हसणे (सहजपणे हसणे) यांत प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदा., 'तुझी मदत करणे याऐवजी 'तुला मदत करणे हवे. 'त्यांचे धन्यवाद' याऐवजी 'त्यांना धन्यवाद' असे म्हणायला हवे.
    भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. 'टेबल' हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही; पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. 'मी स्टडी केली' म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी 'मी अभ्यास केला' म्हणणं योग्य नाही का?

2. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) मराठी भाषेची श्रीमंती -
(ii) मूळ अर्थाखेरीज अन्य अनेक अर्थच्छटा व्यक्त करणारे उताऱ्यात उल्लेखलेले क्रियापद -

3. स्वमत :
लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा.
Answer
1. आकलन कृती
(१) कारणे लिहा :
(i) कारण : क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावावा, हे माहीत नसते.

2. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) मराठी ढंगाचे शब्दप्रयोग
(ii) मारणे

3. स्वमत :
लेखिकेने मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे. होय, माझी मराठी तिच्या अर्थसौंदयांनी श्रीमंत आहे.
माझ्या भाषेकडे बारकाईने पाहा. विविध ढंगांचे शब्दप्रयोग हे माझ्या भाषेचे वैशिष्ट्य आहे. अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थच्छटा प्रकट करतो. 'चालणे' हे साधे क्रियापद बघा. प्रत्यक्ष पायांनी चालणे या अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थच्छटा 'चालणे' या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात. उदाहरणार्थ, लुटूलुटू चालणे, लबाडी चालणे, नोटा नाणी चालणे, एखादे तत्त्व चालणे, एखादया रितीनुसार चालणे, घड्याळ चालणे वगैरे वगैरे. अशी किती वाक्ये सांगू? वाक्प्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा आहे. माझ्या भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत. म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे.
View full question & answer
Question 37 Marks

(i) मराठी भाषेची खास शैली -
(ii) एकाऐवजी दुसरेच क्रियापद वापरल्यास होणारा परिणाम -

3. स्वमत :
लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा.
Answer
1. आकलन कृती
(१) कृती करा :
Image

2. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) वाक्प्रचार
(ii) अर्थाचा अनर्थ

Question 47 Marks

(i) मूळ अर्थाखेरीज अन्य अनेक अर्थच्छटा व्यक्त करणारे उताऱ्यात उल्लेखलेले क्रियापद -
(ii) मराठी भाषेची खास शैली -

3. स्वमत :
लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा.
Answer
1. आकलन कृती
(१) कृती करा :
Image

2. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) मारणे
(ii) वाक्प्रचार

Question 57 Marks
1. आकलन कृती 
(१) आकृत्या पूर्ण करा ::
Image

    भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते. 'मोरांबा' या शब्दातल्या 'मोरा'चा मयूराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी (जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस) संबंध आहे. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात, ते त्यातून कळते.
    'कदर करणे' असे आपण म्हणतो. तो वाक्प्रचार आहे. 'कद्र' या अरबी शब्दापासून 'कदर' (म्हणजे गुणांची पारख) हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो, की आपल्या चुकाही होत नाहीत. उदा., 'अनुसया' असे नाव नसून ते 'अनसूया' असे आहे. 'अन् + असूया' अशी त्यातील संधी आहे. मनात असूया (मत्सर) नसलेली अशी ती 'अनसूया' हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसेच 'जराजर्जर' या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे, 'वार्धक्याने विकल झालेला!' यातील 'ज'चे उच्चार तालव्य (ज्य) आहेत. तर जरा (थोडे), जर (कलाबतू) या शब्दातील 'ज'चे उच्चार दन्तमूलीय आहेत. (दन्तमूलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी.) उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो.
      भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो, या साऱ्यांना महत्त्व असते. 'सूतकताई' हा शब्द जर 'सूतक ताई' असा लिहिला तर कसं वाटेल? तसंच 'अक्षरशः' हा शब्द लिहिताना 'अक्षर शहा' असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का?
    'पुराणातली वांगी पुराणात' या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे, हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल! तिथे मूळ म्हण होती 'पुराणातली वानगी पुराणात.' वानगी म्हणजे उदाहरणे. पण 'वानगी' झाली 'वांगी' आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी! अशी फजिती होते.
     काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात.
     उदाहरणार्थ,
     १. राजाचे 'कलेवर' प्रेम होते.
     २. अपघातस्थळी कडेला एक 'कलेवर' पडले होते.
     येथे पहिल्या वाक्यात 'कलेवर' हे शब्दरूप 'कला' या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे तर दुसऱ्या वाक्यात 'कलेवर' हे नाम असून त्याचा अर्थ 'शव' असा आहे.
     आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे.
     आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. उदा., आता पाऊस पडत आहे. 'पाऊस पडणे' या घटनेविषयी दोन वाक्यांतून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पाहा.
     १. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली.
     २. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या 'मॉर्निंग वॉक'च्या बेतावर पाणी पडले.
     अशी अनेक वाक्ये तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते, त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी.... असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू, हे विसरून चालणार नाही.

2. आकलन कृती
(१) एका शब्दात लिहा :

(i) भलत्याच ठिकाणी तोडल्यामुळे होणारा गोंधळाचा शब्द -
(ii) वनातील महान उत्सव -
(२) चौकटी पूर्ण करा :
(i) दोन शब्दरूपे समान, उच्चार समान, अर्थ मात्र भिन्न असा शब्द -
(ii) दोन शब्दरूपे समान, उच्चार भिन्न, अर्थसुद्धा भिन्न असा शब्द -

3. स्वमत :
'तुम्ही शहाणे आहात, या वाक्यातील 'शहाणे' या शब्दाच्या अर्थच्छटा लिहा.
Answer
1. आकलन कृती
(१) कृती करा :
Image

2. आकलन कृती
(१) एका शब्दात लिहा :

(i) सूतकताई
(ii) वनमहोत्सव
(२) चौकटी पूर्ण करा :
(i) कलेवर
(ii) पुण्यात

3. स्वमत :
तुम्ही शहाणे आहात,' असे अनेकदा म्हटले जाते. त्या वेळी ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर, त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो. आई आपल्या मुलाला, "बाळा, तू शहाणा आहेस" असे म्हणते, तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलाबद्दल विश्वास असतो.
मात्र प्रत्येक वेळेला 'तुम्ही शहाणे आहात, या वाक्याचा असा सरळ, प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच, असे नाही. काही व्यक्ती मुळातच लबाड असतात. चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात. कितीही समजावून सांगितले, तरी त्यांना ते समजून घ्यायचे नसते. मग त्यांना उपरोधाने 'तुम्ही शहाणे आहात, असे ऐकवावेलागते. येथे 'शहाणे हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात 'तुम्ही अतिशहाणे आहात, म्हणजे 'तुम्ही मूर्ख आहात,' असेच म्हणत असतो.
View full question & answer
Question 67 Marks
1. आकलन कृती 
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा
(ii) शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे एक साधन
(iii) भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग

    भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते. 'मोरांबा' या शब्दातल्या 'मोरा'चा मयूराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी (जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस) संबंध आहे. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात, ते त्यातून कळते.
    'कदर करणे' असे आपण म्हणतो. तो वाक्प्रचार आहे. 'कद्र' या अरबी शब्दापासून 'कदर' (म्हणजे गुणांची पारख) हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो, की आपल्या चुकाही होत नाहीत. उदा., 'अनुसया' असे नाव नसून ते 'अनसूया' असे आहे. 'अन् + असूया' अशी त्यातील संधी आहे. मनात असूया (मत्सर) नसलेली अशी ती 'अनसूया' हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसेच 'जराजर्जर' या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे, 'वार्धक्याने विकल झालेला!' यातील 'ज'चे उच्चार तालव्य (ज्य) आहेत. तर जरा (थोडे), जर (कलाबतू) या शब्दातील 'ज'चे उच्चार दन्तमूलीय आहेत. (दन्तमूलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी.) उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो.
      भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो, या साऱ्यांना महत्त्व असते. 'सूतकताई' हा शब्द जर 'सूतक ताई' असा लिहिला तर कसं वाटेल? तसंच 'अक्षरशः' हा शब्द लिहिताना 'अक्षर शहा' असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का?
    'पुराणातली वांगी पुराणात' या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे, हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल! तिथे मूळ म्हण होती 'पुराणातली वानगी पुराणात.' वानगी म्हणजे उदाहरणे. पण 'वानगी' झाली 'वांगी' आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी! अशी फजिती होते.
     काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात.
     उदाहरणार्थ,
     १. राजाचे 'कलेवर' प्रेम होते.
     २. अपघातस्थळी कडेला एक 'कलेवर' पडले होते.
     येथे पहिल्या वाक्यात 'कलेवर' हे शब्दरूप 'कला' या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे तर दुसऱ्या वाक्यात 'कलेवर' हे नाम असून त्याचा अर्थ 'शव' असा आहे.
     आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे.
     आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. उदा., आता पाऊस पडत आहे. 'पाऊस पडणे' या घटनेविषयी दोन वाक्यांतून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पाहा.
     १. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली.
     २. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या 'मॉर्निंग वॉक'च्या बेतावर पाणी पडले.
     अशी अनेक वाक्ये तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते, त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी.... असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू, हे विसरून चालणार नाही.

2. आकलन कृती
(१) लेखिकेच्या मते, भाषेवरील प्रेमासाठी पुढील कृती केल्या पाहिजेत :
(i) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(ii) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙

3. स्वमत :
'गरज नसताना इतर भाषांमधील शब्द वापरून बोलू नये,' या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा.
Answer
1. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) हवा
(ii) शब्दकोश
(iii) व्युत्पत्ती शोधणे

2. आकलन कृती
(१) लेखिकेच्या मते, भाषेवरील प्रेमासाठी पुढील कृती केल्या पाहिजेत :

(i) भाषेशी जिव्हाळ्याचे नाते राखायला हवे
(ii) भाषेचे ज्ञानही मिळवायला हवे.

3. स्वमत :
परभाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत, ते आपण स्वीकारले आहेत.
मात्र काही वेळा परभाषेतील शब्द अकारण वापरले जातात आणि तेसुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थ, समर्पक शब्द असताना ! अलीकडे "ती पिवळीवाली दया", "तो पांढरावाला पट्टा दाखवा" अशी वाक्ये सरांस ऐकू येतात. वास्तविक पाहता 'पिवळी बॅग' आणि 'पिवळीवाली बॅग' यांत कोणता फरक आहे? 'पिवळी बॅग' या शब्दप्रयोगातून आधीपासूनच योग्य अर्थ व्यक्त होत असताना पिवळीवाली' हा नवीन शब्दप्रयोग का करावा ? मराठीत 'वाला' हा प्रत्यय फक्त नामाला जोडला जातो. 'पिवळी ' हे विशेषण आहे. मराठीत विशेषणाला किंवा सर्वनामाला 'बाला' हा प्रत्यय जोडण्याची प्रथाच नाही. शिवाय त्या नवीन शब्दप्रयोगाने अर्थामध्ये कोणतीही भर पडत नाही. म्हणून गरज नसताना परभाषेतील शब्द वापरून बोलू नये, हे लेखिकेचे मत योग्यच आहे.
View full question & answer
Question 77 Marks
1. आकलन कृती 
(१) कृती करा :
(i) भाषेमध्ये अनेक शब्द सतत येतात; कारण

    परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता.
    बायको : "तुम्हांला, मी उत्तप्पा बनवू का?"
    नवरा : "नको. मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादू‌गार!"
    आता इथे विनोद निर्माण झाला आहे. कारण 'बनवणे' हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत; पण हल्ली सगळे पदार्थ फक्त 'बनवले जातात. मराठीत 'बनवणे' म्हणजे 'फसवणे' असा अर्थ खरं तर रूढ आहे, त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस 'बनवणारा' जादू‌गार, विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला, तर आश्चर्य नाही.
मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत 'मारणे' हे एक क्रियापद घेतले, तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते, हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे, गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, (पोहताना) हातपाय मारणे, माश्या मारणे इत्यादी. 'मारणे' म्हणजे 'मार देणे' हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते.
शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार हीदेखील भाषेची खास शैली असते. 'खस्ता खाणे 'मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही, हे माहीत आहे ना? तसेच 'कंठस्नान घालणे' हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्ळ्याखालून 'अंघोळ घालणे', असा शब्दशः अर्थ नाही. 'खांदयाला खांदा लावणे' (सहकार्य करणे) आणि 'खांदा देणे' (प्रेताला खांदा देणे) यांतला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले, तर अर्थाचा अनर्थ होईल. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. 'अक्कलवान' म्हणजे हुशार; पण अकलेचा कांदा' म्हणजे 'अतिशहाणा' हे माहीत नसेल, तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय, हेच आपल्याला कळणार नाही.
    क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो, हे नीट माहीत नसले तरीदेखील अर्थाचा गोंधळ होतो. उदा., अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे (तिची चेष्टा करणे या अर्थी) आणि तिच्याशी हसणे (सहजपणे हसणे) यांत प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदा., 'तुझी मदत करणे याऐवजी 'तुला मदत करणे हवे. 'त्यांचे धन्यवाद' याऐवजी 'त्यांना धन्यवाद' असे म्हणायला हवे.
    भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. 'टेबल' हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही; पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. 'मी स्टडी केली' म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी 'मी अभ्यास केला' म्हणणं योग्य नाही का?

2. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :
 मराठी भाषेची श्रीमंती -
(२) पुढील विधानांतील चुकीचे विधान ओळखून लिहा :
(i) मराठी भाषा इतर कोणत्याही भाषांमधील शब्द आपले मानत नाही.
(ii) भाषा नदीसारखी प्रवाही असते.
(iii) मराठी भाषेचे व्याकरण झुगारणे योग्य नाही.
(iv) भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात.

3. स्वमत :
लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा.
Answer
1. आकलन कृती
(१) कारणे लिहा :
(i) कारण : भाषा नदीसारखी प्रवाही असते.

2. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :
बनवणे
(२) पुढील विधानांतील चुकीचे विधान ओळखून लिहा :
चुकीचे विधान (1) मराठी भाषा इतर कोणत्याही भाषांमधील शब्द आपले मानत नाही.

3. स्वमत :
लेखिकेने मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे. होय, माझी मराठी तिच्या अर्थसौंदयांनी श्रीमंत आहे.
माझ्या भाषेकडे बारकाईने पाहा. विविध ढंगांचे शब्दप्रयोग हे माझ्या भाषेचे वैशिष्ट्य आहे. अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थच्छटा प्रकट करतो. 'चालणे' हे साधे क्रियापद बघा. प्रत्यक्ष पायांनी चालणे या अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थच्छटा 'चालणे' या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात. उदाहरणार्थ, लुटूलुटू चालणे, लबाडी चालणे, नोटा नाणी चालणे, एखादे तत्त्व चालणे, एखादया रितीनुसार चालणे, घड्याळ चालणे वगैरे वगैरे. अशी किती वाक्ये सांगू? वाक्प्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा आहे. माझ्या भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत. म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे.
View full question & answer
Question 87 Marks
1. आकलन कृती 
(१) कृती करा :
(i) कधी कधी वाक्यातून विपरीत अर्थ निर्माण होतो; कारण

(i) कारण : मराठी शब्दाचा रूढ अर्थ बाजूला सारून त्या शब्दाचा परभाषेतला अर्थ घेऊन वाक्ये तयार केली जातात.

2. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) वाक्प्रचार
(ii) अर्थाचा अनर्थ

3. स्वमत :
लेखिकेने मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे. होय, माझी मराठी तिच्या अर्थसौंदयांनी श्रीमंत आहे.
माझ्या भाषेकडे बारकाईने पाहा. विविध ढंगांचे शब्दप्रयोग हे माझ्या भाषेचे वैशिष्ट्य आहे. अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थच्छटा प्रकट करतो. 'चालणे' हे साधे क्रियापद बघा. प्रत्यक्ष पायांनी चालणे या अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थच्छटा 'चालणे' या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात. उदाहरणार्थ, लुटूलुटू चालणे, लबाडी चालणे, नोटा नाणी चालणे, एखादे तत्त्व चालणे, एखादया रितीनुसार चालणे, घड्याळ चालणे वगैरे वगैरे. अशी किती वाक्ये सांगू? वाक्प्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा आहे. माझ्या भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत. म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे.
View full question & answer
Question 97 Marks
1. आकलन कृती 
(१) कृती करा :
Image

    परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता.
    बायको : "तुम्हांला, मी उत्तप्पा बनवू का?"
    नवरा : "नको. मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादू‌गार!"
    आता इथे विनोद निर्माण झाला आहे. कारण 'बनवणे' हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत; पण हल्ली सगळे पदार्थ फक्त 'बनवले जातात. मराठीत 'बनवणे' म्हणजे 'फसवणे' असा अर्थ खरं तर रूढ आहे, त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस 'बनवणारा' जादू‌गार, विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला, तर आश्चर्य नाही.
मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत 'मारणे' हे एक क्रियापद घेतले, तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते, हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे, गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, (पोहताना) हातपाय मारणे, माश्या मारणे इत्यादी. 'मारणे' म्हणजे 'मार देणे' हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते.
शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार हीदेखील भाषेची खास शैली असते. 'खस्ता खाणे 'मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही, हे माहीत आहे ना? तसेच 'कंठस्नान घालणे' हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्ळ्याखालून 'अंघोळ घालणे', असा शब्दशः अर्थ नाही. 'खांदयाला खांदा लावणे' (सहकार्य करणे) आणि 'खांदा देणे' (प्रेताला खांदा देणे) यांतला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले, तर अर्थाचा अनर्थ होईल. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. 'अक्कलवान' म्हणजे हुशार; पण अकलेचा कांदा' म्हणजे 'अतिशहाणा' हे माहीत नसेल, तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय, हेच आपल्याला कळणार नाही.
    क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो, हे नीट माहीत नसले तरीदेखील अर्थाचा गोंधळ होतो. उदा., अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे (तिची चेष्टा करणे या अर्थी) आणि तिच्याशी हसणे (सहजपणे हसणे) यांत प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदा., 'तुझी मदत करणे याऐवजी 'तुला मदत करणे हवे. 'त्यांचे धन्यवाद' याऐवजी 'त्यांना धन्यवाद' असे म्हणायला हवे.
    भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. 'टेबल' हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही; पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. 'मी स्टडी केली' म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी 'मी अभ्यास केला' म्हणणं योग्य नाही का?

2. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) मूळ अर्थाखेरीज अन्य अनेक अर्थच्छटा व्यक्त करणारे उताऱ्यात उल्लेखलेले क्रियापद -
(ii) मराठी भाषेची खास शैली -
(२) पुढील विधानांतील चुकीचे विधान ओळखून लिहा :
(i) मराठी भाषा इतर कोणत्याही भाषांमधील शब्द आपले मानत नाही.
(ii) भाषा नदीसारखी प्रवाही असते.
(iii) मराठी भाषेचे व्याकरण झुगारणे योग्य नाही.
(iv) भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात.

3. स्वमत :
लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा.
Answer
1. आकलन कृती
(१) कृती करा :
Image

2. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) मारणे
(ii) वाक्प्रचार
(२) पुढील विधानांतील चुकीचे विधान ओळखून लिहा :
चुकीचे विधान - (i) मराठी भाषा इतर कोणत्याही भाषांमधील शब्द आपले मानत नाही.

3. स्वमत :
लेखिकेने मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे. होय, माझी मराठी तिच्या अर्थसौंदयांनी श्रीमंत आहे.
माझ्या भाषेकडे बारकाईने पाहा. विविध ढंगांचे शब्दप्रयोग हे माझ्या भाषेचे वैशिष्ट्य आहे. अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थच्छटा प्रकट करतो. 'चालणे' हे साधे क्रियापद बघा. प्रत्यक्ष पायांनी चालणे या अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थच्छटा 'चालणे' या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात. उदाहरणार्थ, लुटूलुटू चालणे, लबाडी चालणे, नोटा नाणी चालणे, एखादे तत्त्व चालणे, एखादया रितीनुसार चालणे, घड्याळ चालणे वगैरे वगैरे. अशी किती वाक्ये सांगू? वाक्प्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा आहे. माझ्या भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत. म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे.
View full question & answer
Question 107 Marks
1. आकलन कृती 
(१) कृती करा :
Image

    परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता.
    बायको : "तुम्हांला, मी उत्तप्पा बनवू का?"
    नवरा : "नको. मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादू‌गार!"
    आता इथे विनोद निर्माण झाला आहे. कारण 'बनवणे' हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत; पण हल्ली सगळे पदार्थ फक्त 'बनवले जातात. मराठीत 'बनवणे' म्हणजे 'फसवणे' असा अर्थ खरं तर रूढ आहे, त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस 'बनवणारा' जादू‌गार, विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला, तर आश्चर्य नाही.
मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत 'मारणे' हे एक क्रियापद घेतले, तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते, हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे, गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, (पोहताना) हातपाय मारणे, माश्या मारणे इत्यादी. 'मारणे' म्हणजे 'मार देणे' हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते.
शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार हीदेखील भाषेची खास शैली असते. 'खस्ता खाणे 'मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही, हे माहीत आहे ना? तसेच 'कंठस्नान घालणे' हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्ळ्याखालून 'अंघोळ घालणे', असा शब्दशः अर्थ नाही. 'खांदयाला खांदा लावणे' (सहकार्य करणे) आणि 'खांदा देणे' (प्रेताला खांदा देणे) यांतला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले, तर अर्थाचा अनर्थ होईल. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. 'अक्कलवान' म्हणजे हुशार; पण अकलेचा कांदा' म्हणजे 'अतिशहाणा' हे माहीत नसेल, तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय, हेच आपल्याला कळणार नाही.
    क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो, हे नीट माहीत नसले तरीदेखील अर्थाचा गोंधळ होतो. उदा., अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे (तिची चेष्टा करणे या अर्थी) आणि तिच्याशी हसणे (सहजपणे हसणे) यांत प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदा., 'तुझी मदत करणे याऐवजी 'तुला मदत करणे हवे. 'त्यांचे धन्यवाद' याऐवजी 'त्यांना धन्यवाद' असे म्हणायला हवे.
    भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. 'टेबल' हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही; पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. 'मी स्टडी केली' म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी 'मी अभ्यास केला' म्हणणं योग्य नाही का?

2. आकलन कृती 
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) हिंदी भाषेतून आलेले आणि स्वयंपाकघरात घुसलेले क्रियापद -
(ii) मराठी भाषेची श्रीमंती -

3. स्वमत :
लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा.
Answer
1. आकलन कृती
(१) कृती करा :
Image

2. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) बनवणे -
(ii)मराठी ढंगाचे शब्दप्रयोग -