(१) कोष्टके पूर्ण करा :

'संवाद' हे दोन जिवांना जोडणारे अत्यंत प्रभावी साधन आहे. संवाद साधण्याची कला माणसालाच अवगत आहे. संवादात शब्द असतात, भावना असतात, भावनांचे पाझर असतात, प्रहार असतात. आपण लहान मुलांपासून ते वरिष्ठांपर्यंत अनेकांशी संवाद साधत असतो. प्रसंगपरत्वे, व्यक्तिपरत्वे संवादातील शब्दांची लय बदलत असते. संवादातील शब्दाच्या पाठीमागे ते उच्चारणाऱ्याचे व्यक्तिमत्त्व उभे असते. अगदी फोनवरून 'हॅलो' उच्चारताना काही माणसं असा लांबलचक सूर आळवतात की, ऐकणाऱ्याला हसू येते; किंवा काही माणसं अशा दांडग्या आवाजात प्रतिसाद देतात की, शेजारच्याला वाटते, याने फोन बाजूला करून संभाषण केले तरी फोन करणाऱ्याला ते थेट ऐकू जाईल. 'शब्द' ही मुळातच एक विलक्षण शक्ती आहे. त्यात उत्कटता असते, भव्यता असते, सौंदर्य असते.
2. आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) दोन जिवांना जोडणारे प्रभावी साधन →‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾
(ii) संवाद साधण्याची कला फक्त यालाच येते →‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾




