Question 14 Marks
'कर्तृत्वाचे घडवी वेरुळ, कर्तव्याला मुकु नको
मातेसह मातीचे देणे फेडायाला चुकु नको!'
मातेसह मातीचे देणे फेडायाला चुकु नको!'
Answer
View full question & answer→आशयसौंदर्य: तरुण पिढीने आपली वागणूक कशी ठेवावी व कोणत्या सकारात्मक गोष्टी कराव्यात नि कोणत्या गोष्टी टाळाव्यात यांचे डोळस मार्गदर्शन कवी संदीप खरे यांनी 'आपुले जगणे... आपुली ओळख!' या कवितेत केले आहे. आपले जगणे मूल्यवान असावे. माणुसकी जपावी. कर्तृत्वाचे शिखर उभारून आदर्शवत पवित्र जीवन जगण्याची शिकवण ही कविता देते.
काव्यसौंदर्य : कवितेत नवीन तरुण पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन करताना कवी म्हणतो- आपले जीवन मूल्यवान व अर्थपूर्ण करून स्वाभिमानाने जगावे. उपरोक्त ओळींत त्यांनी वेरूळच्या लेण्यांचा संदर्भ दिला आहे. वेरूळची लेणी हे महाराष्ट्राचे भूषणावह शिल्प आहे. अशा प्रकारे आयुष्यात कर्तृत्वरूपी वेरूळची लेणी घडवावीत. उत्तुंग कर्तृत्व घडवावे. कर्तव्याला कधी नाकारू नये. या मातृभूमीचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. त्या उपकारांची परतफेड करायला चुकू नये.
भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत 'फटका' हा पूर्वापार चालत आलेला छंदप्रकार वापरला आहे. काय करावे व काय करू नये, यांचे थेट संवादात्मक वर्णन फटक्यात केलेले असते. उपदेशात्मक गाभा असतो, जो या कवितेत तंतोतंत पाळला आहे. कुठेही प्रतीकांच्या व प्रतिमांच्या जंजाळात ही कविता अडकलेली नाही. थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोटी यात आहे. भाषा परखड व ओघवती असल्यामुळे हृदयाला जाऊन भिडते. यमकप्रधान कविता असूनही एक संथ, लांबलचक अंतर्गत लय कवितेला पोषक ठरली आहे.