Question types

११. मातीची सावली question types

48 questions across 10 question groups — pick any mix to generate a मराठी - कुमारभारती paper with step-by-step answer keys.

48
Questions
10
Question groups
5
Question types
Sample Questions

११. मातीची सावली questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

1. आकलन कृती
(१) आकृती पूर्ण करा :
Image

      " येड्या, फरसू, लोकं जमिनी ईकून मजा करतात. गाड्या घेतात.. बंगले बांदतात.. तुला आपलं जलमभर ढोरहारकं खपाला पाये.."
      "तू सुदं त्या बिल्डरहारका जाला रे, आबू!" फरसूने आवाज चढवत त्याला फटकारले. मग त्याच्याकडे पाठ वळवून तो खालच्या आवाजात म्हणाला, " माती नयेल ते ढोराअ जीवन तरी काय कामाअ ? आबू, आमी लागले रे आथं वाटेल.. पण आमशी नातंपण.. त्यांना कायच नयू रेणार रे.. त्यांना पायाखालती जमीनच नय् रे.."
      "पुढचं पुढे बगून घेतील ते," आबू त्याच्या खांदयावर थोपटत म्हणाला," आजकालशी पोरं खूप हुशार हायेत.. त्यांशे पाय जमिनीवर नाय.. यी पोरं बोटीवर जातात.. ईमानात जातात.. अरबस्तानात, इंग्लंड, अमेरिका कटे कटे गेल्यात पोरं आपली... चल तू, टाइम बग कवडा जाला.. जा, नीज.."
      आबू निघून गेला. त्याची सावली मांजरीसारखी घुटमळत त्याच्या मागे गेली.
     फरसू पाठमोऱ्या आबूकडे पाहतच राहिला. अचानक त्याची नजर डावीकडे वळली. त्याच्या दीड एकराच्या तुकड्यातून ती भलीमोठी इमारत कोंभासारखी वरवर येत होती. मंद चांदण्या प्रकाशात ते धूड अक्राळविक्राळ भासत होतं. इमारतीची काळी ठिप्पूस सावली झाडंझुडपं सपाट केलेल्या शेताला कवटाळत सुस्तावल्यासारखी अस्ताव्यस्त पसरली होती.
     फरसूला वाटलं, ही आपल्या मातीची सावली आहे.

2. आकलन कृती:
(१) पाठाच्या आधारे फरसूचे पुढील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा :
(१) छंद

3. स्वमत : 
• पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
View full solution
1. आकलन कृती
(१) विधाने पूर्ण करा :
(१) आबूच्या मते, जमीन विकल्याने ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(२) फरसूच्या मते, जमीन नसेल, तर˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙

      " येड्या, फरसू, लोकं जमिनी ईकून मजा करतात. गाड्या घेतात.. बंगले बांदतात.. तुला आपलं जलमभर ढोरहारकं खपाला पाये.."
      "तू सुदं त्या बिल्डरहारका जाला रे, आबू!" फरसूने आवाज चढवत त्याला फटकारले. मग त्याच्याकडे पाठ वळवून तो खालच्या आवाजात म्हणाला, " माती नयेल ते ढोराअ जीवन तरी काय कामाअ ? आबू, आमी लागले रे आथं वाटेल.. पण आमशी नातंपण.. त्यांना कायच नयू रेणार रे.. त्यांना पायाखालती जमीनच नय् रे.."
      "पुढचं पुढे बगून घेतील ते," आबू त्याच्या खांदयावर थोपटत म्हणाला," आजकालशी पोरं खूप हुशार हायेत.. त्यांशे पाय जमिनीवर नाय.. यी पोरं बोटीवर जातात.. ईमानात जातात.. अरबस्तानात, इंग्लंड, अमेरिका कटे कटे गेल्यात पोरं आपली... चल तू, टाइम बग कवडा जाला.. जा, नीज.."
      आबू निघून गेला. त्याची सावली मांजरीसारखी घुटमळत त्याच्या मागे गेली.
     फरसू पाठमोऱ्या आबूकडे पाहतच राहिला. अचानक त्याची नजर डावीकडे वळली. त्याच्या दीड एकराच्या तुकड्यातून ती भलीमोठी इमारत कोंभासारखी वरवर येत होती. मंद चांदण्या प्रकाशात ते धूड अक्राळविक्राळ भासत होतं. इमारतीची काळी ठिप्पूस सावली झाडंझुडपं सपाट केलेल्या शेताला कवटाळत सुस्तावल्यासारखी अस्ताव्यस्त पसरली होती.
     फरसूला वाटलं, ही आपल्या मातीची सावली आहे.

2. आकलन कृती:
(१) कसे/कशी ते लिहा :
(१) इमारत वर येत होती  - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 
(२) चांदण्या प्रकाशात धूड भासत होते - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 
(३) इमारतीची सावली - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 
(४) शेताला कवटाळत अस्ताव्यस्त पसरली होती - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 
3. स्वमत : 
• 'फरसूला वाटलं, ही आपल्या मातीची सावली आहे, या विधानाचा आशय तुमच्या शब्दांत सांगा. किंवा 'मातीची सावली' या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.
View full solution
1. आकलन कृती
(१) एका वाक्यात लिहा :
(१) उताऱ्यातील संवाद कोणाकोणामध्ये चालला आहे?
(२) फरसूच्या मते, पैसा म्हणजे काय?

        "फरसू ऽऽ, फरसू अरे रातच्या पारा एकटाच बायेर काय करते?" आबूचा आवाज ऐकून फरसू थोडा भानावर आला.
        "आबू, बग पयली माजी बायको कोसू गेली.. मंगं जमीन गेली... घर सुद्धा पाडून टाकीलं न् शेवटी ती चिंच पण कापिली.. माजा एकटा पूत.. तो सुदं आर्थ माजा नय् रायला रे... जेजूस आथं मानासुदं नेलं ते बरं होईल.."
        "अरे, अया रडते काय फरसू ? मी.. तुजा दोस्त आबू हय्, इनूस मास्तर हय.. अं? न तुजा पोरगा, सूनबाय, पोरी, जावांय हत् नं? कोणी तुला टाकणार नय ? आमचा फरसू खरंस डोकरा जाला आथं.." आबू उसनं हसत म्हणाला.
        " आबू, यी माया रगताई माणसं.. पण जमीन इकली, पैशे आले न् ते बापाला इसरले.. आता माजं कोणी नय् रायलं ! माजी जमीन गेली.. मी तिला ईकून टाकलं.. मनूनं कागद आणला, मी सयी केली.. मी बेईमानी केली.. माज्या मायला फशीलं..
        ":अरे येड्या, किती लोक जमिनी ईकितात. तू आपला नुस्ता रडत बवलाय.. बग, टोपलीभर पैसा मिळालाय मनूला.. आथं मातीत हात घालाशी गरज नय्.. सुखात खा मरेपरत.."
        " तो पैसा नय् रे आबू.. ते आमशा आजा, पणजाअं रगत हय्.. रगताअं नातं तुटे नय्.. रगताये शाप भोगाला लागतात.. ते शाप मीस भोगीन.. आथं पैसा नय् का सुख नय्.. जेजूस माफ कर रे !" फरसूने हात जोडून आकाशाकडे पाहिले.

2. आकलन कृती:
(१) चौकटी पूर्ण करा :
(१) फरसू बाहेर बसला तो प्रहर  - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 
(२) अखेरीस कापले ते झाड - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 
(२) का ते लिहा :
फरसूने हात जोडून आकाशाकडे पाहिले.

3. स्वमत : 
• 'फरसूच्या घरातील यातनादायक वातावरणाला फरसू व मनू हे दोघेही सारखेच जबाबदार आहेत.' विधान स्पष्ट करा.
View full solution
1. आकलन कृती
(१) कोष्टक पूर्ण करा :
कृतीकृतीमागील भावना
(१) फरसू पुढ्यातली बशी सरकवून उठला. खदि पाडून, मान खाली घालून अंगणात आला. 
(२) सूनबाई व मनू या दोघांनीही शांतपणे जेवण पुढे चालू केले. 

        पाल अंगावर पडावी, तसे मनूचे शब्द ऐकून फरसूचे अंग थरारले. सूनबाई जेवायची थांबली होती. मनूच्या चेहऱ्यावर घर बांधल्याचा अभिमान काठोकाठ पसरला होता. फरसूला पोटात खड्‌डा पडल्यासारखं झालं. पुढ्यातली बशी सरकवून तो उठला. सूनबाई जेवू लागली. मनूही जेवू लागला.
       फरसू खांदे पाडून, मान खाली घालून अंगणात आला.
       बिल्डरने मनूला सुंदर, आटोपशीर बंगला बांधून दिला. त्याच्या समोरच त्याची भलीमोठी इमारत आकाराला येत होती.
       फरसूला वाटलं, जमिनीवरनं ट्रॅक्टर फिरला, बागायत मातीला मिळाली, मोठाले खड्डे खणले गेले, भलंमोठं दगडविटांचं धूड तिच्यावर उभारलं गेलं, तेव्हा त्या मायला काय वाटलं असेल? आणि या मातीशी नाळ तुटली की माणूसपण तरी कसं राहणार? पाय मातीवर असतात, तोवरच माणूस माणूस असतो.. पोराने मातीशी नातं राखलं नाही, आता बापाशीही नातं सांगत नाही. सिमेंट, दगड, धोंड्यांशी का कधी माणसाचं नातं सांधलं जातं? मातीनंच घडवलंय ना आपणा सर्वांना? आणि शेवटी तिच्याच तर कुशीत विश्रांतीसाठी जायचं आहे.. तिलाच विकून आम्ही या गुळगुळीत, चकचकीत घरात राहायला आलो..
       चंद्रप्रकाश सर्वत्र लखलखत होता. पूर्वी पावसासारखं चांदणं चिंचेतून ठिबकायचं. घरातील जुनीपुराणी वस्तू विकावी, तसं ते झाडही गेलं. आंबा, फणस, भेंडी, नेवर.. सारी जमीनदोस्त झाली.
       मनू एकदा म्हणाला, "यी झाडं मणजे नुस्ता कचरा.. उंदीर कवडे येतात घरात... आपल्या बंगल्यापुडं यी जंगली झाडं अजिबात शोभत नाय.. कापून मस्त गुलाब लावू.."
       तेव्हा फरसू उत्तरला होता, "पोरा, झाडं जंगली नसतात रे कवा ! आपण माणसंच जंगली.. कुराडी घेऊन झाडं कापणारी आपण माणसंच जंगली रे, मनू.."
फरसूच्या जन्माआधीची ती झाडं फरसूच्या डोळ्यांदेखत तोडली गेली. मनूने त्या ठिकाणी इंग्लिश गुलाबांची बाग फुलवली.

2. आकलन कृती:
(१) आकृती पूर्ण करा :
Image
3. स्वमत : 
• 'मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसे राहणार?' या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास, त्याची कारणे सोदाहरण लिहा.
View full solution
1. आकलन कृती
(१) ओघतक्ता तयार करा :

(१) उत्तर लिहा :
फरसूच्या दृष्टीने जमिनीवर झालेले अत्याचार:
(१) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(२) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(३) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(४) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙

3. स्वमत : 
• 'मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसे राहणार?' या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास, त्याची कारणे सोदाहरण लिहा.
View full solution
मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे.
अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे? - ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
View full solution
मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे.
अचेतन गोष्टीने केलेली कृती . -˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙.
View full solution
मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे.
प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट . -˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙.
View full solution
पुढील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा :
नित्याचेच दुःख होते
उशागती बसलेले
............तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार।

अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवीय आहेत का? → ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ , ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾
View full solution
पुढील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा :
नित्याचेच दुःख होते
उशागती बसलेले
............तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार।

अचेतन गोष्टी या क्रिया करतात → ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ , ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾
View full solution
पुढील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा :
"त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी."
View full solution
पुढील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा :
"आमसा जलम या मातीत गेल्ता मणून थोडं वायीट वाटते."
View full solution
पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा :
डोळे भरून येणे -
(१) खूप रडणे (२) दुःख होणे (३) डोळ्यांत पाणी येणे.
View full solution
पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा :
नाळ तुटणे -
(१) मैत्री जमणे (२) संबंध न राहणे (३) संबंध जुळणे.
View full solution
पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा :
टकळी चालवणे -
(१) सूत कातणे (२) सतत बोलणे (३) वस्त्र विणणे.
View full solution

Generate a ११. मातीची सावली paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App