Question 18 Marks
1. आकलन कृती
(१) आकृती पूर्ण करा :

कंबर बांधून ऊठ घाव झेलाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।
महाराष्ट्र मंदिरापुढती । पाजळे याशीची ज्योती
सुवर्ण धरा खालती। निल अंबर भरले वरती
गड पुढे पोवाडे गाती । भूषवी तिला महारथी
तो अरबी सागर लागे जयाचे पाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।
ही मायभूमि धीरांची। शासनकर्त्या वीरांची
घामाची आणि श्रमाची । खुरप्याची आणि दोरीची
संतांची, शाहीरांची । त्यागाच्या तलवारीची
स्मरून धुरंधर आता त्या शिवराया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।
पहा पर्व पातले आजचे । संयुक्त महाराष्ट्राचे
साकार स्वप्न करण्याचे। करी कंकण बांधून साचे
पर्वत उलथून यत्नाचे । सांधू या खंड की त्याचे
या सत्यास्तव मैदानि शिंग फुंकाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।
धर ध्वजा करी ऐक्याची। मनीषा जी महाराष्ट्राची
पाऊले टाक हिंमतीची । कणखर जणु पोलादाची
घे आण स्वातंत्र्याची । महाराष्ट्रास्तव लढण्याची
उपकार फेडुनी जन्मभूमीचे जाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।
2. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :
(१) शिवरायांना म्हटले आहे - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾
(२) पर्वत उलथायचे आहेत - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾
(३) तलवार आहे ती - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾
(२) योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :
(१) महाराष्ट्रासाठी लढण्याची स्वातंत्र्याची ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙ घे.
(शपथ / तलवार / कंकण / स्वप्ने)
3. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ
(१) पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा :
• ही मायभूमि धीरांची। शासनकर्त्या वीरांची
घामाची आणि श्रमाची। खुरप्याची आणि दोरीची
संतांची, शाहिरांची। त्यागाच्या तलवारीची
स्मरून धुरंधर आता त्या शिवराया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।
4. स्वमत :
• कवितेतून व्यक्त झालेली 'महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता' हा विचार स्पष्ट करा.

Answer
View full question & answer→1. आकलन कृती
(१) आकृती पूर्ण करा :

2. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :
(१) धुरंधर
(२) प्रयत्नांचे
(३) त्यागाची
(२) योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :
(१) शपथ
3. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ
(१) पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा :
• ही माझी मातृभूमी धैर्यवंतांची आहे. वीर राज्यकर्त्यांची आहे. घाम गाळून कष्टाने हिचे आपण रक्षण केले आहे. ही शेतकऱ्यांच्या खुरप्यांची व दोरीची भूमी आहे. ही संतांची, शाहिरांची भूमी आहे. इथे त्यागरूपी तलवार फिरून राखलेली भूमी आहे. ज्या भूमीवर श्रीछत्रपती शिवाजी महाराजांनी अधिराज्य निर्माण केले त्या धुरंधर वीर शिवरायांचे कर्तृत्व आठवून या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती दे.
4. स्वमत :
• महाराष्ट्र हे मंदिर आहे. त्याच्या पुढ्यात यशाची ज्योत पाजळते. महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी आहे आणि वर निळ्या आकाशाची छाया आहे. गडकिल्ले महाराष्ट्रभूमीचे पोवाडे गातात. रथीमहारर्थीनी तिला भूषवले आहे. अरबी समुद्र तिच्या चरणांशी लीन आहे. महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्यांचा, साधुसंतांचा, शाहिरांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, त्यागाच्या सामर्थ्यांचा व धुरंधर शिवरायांचा आहे. या प्रिय महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलायला आणि त्यावर जान कुर्बान करायला मी तयार आहे. अशा प्रकारे कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झाली आहे.