(१) आकृती पूर्ण करा :

त्या जुन्या बांगड्या बधून सगळीजणं हसायला लागली. प्रीतम ओशाळवाणा झाला. मी मुलाना दटावत चटकन त्या बांगड्या हातात चढवल्या अन् अत्तराची बाटली उघडून मनगटावर अत्तर लावले, वास घेतला अन् हसणाऱ्या एक दोधांना वास घ्यायला सांगितले अन् म्हटले, "बधा, किती छान सुगंध आहे."
माझ्या बोलण्यावर त्यांना 'हो' म्हणावेच लागले.
प्रीतमचा चेहरा उजळला. तो हळूच जवळ येऊन म्हणाला, "बाई, माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या अन् अत्तर मी तुम्हाला दिले. तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे. खास माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत त्या."
मी चटकन त्याच्या केसावरून हात फिरवत म्हटले, "प्रीतम, तुझी भेट, त्यामागच्या भावना मला समजल्या. मला आवडली तुझी भेट. दुसरे कुणी हसले तरी तू वाईट वाटून घेऊ नको."
त्याच्या माझ्यातला अतूट धागा असा अधिकाधिक चिवट होत गेला. मी कधी कधी त्याच्या वर्गाला शिकवत नव्हते, तरीही ते धागे फुलत आमच्यामध्ये नाते विणत राहिले.
तो चांगल्या रीतीने मॅट्रिक झाला अन् भग होस्टेलला राहून बारावी झाला. त्याला एन. डी. ए. मध्ये प्रवेश मिळाल्याचे त्याने मला पत्राने कळवले. दरवर्षी त्याचे नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारे पत्र येई. मी माझ्या वाढत्या संसारात गुरफटले होते त्यामुळे उत्तर पाठवेनच असे नव्हते; पण तो अगदी काटेकोर हाता.
2. आकलन कृती:
(१) का ते सांगा :
(१) प्रीतम म्हणाला, "या बाई माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय."
(२) प्रीतम म्हणाला, "केव्हाही मुलगा म्हणून हाक मारा, धावत येईन."
3. स्वमत :
• प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्ये शोधा व लिहा.
