Questions

पुढे दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा

Take a timed test

1 question · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 14 Marks
'पाहूनि सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या'
Answer
आशयसौंदर्य : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी 'या झोपडीत माझ्या' या कवितेत महालातील सुखे व झोपडीतील सुखे यांची मार्मिकपणे तुलना केली आहे. श्रीमंतीचा, वैभवाचा बडेजाव न करता झोपडीतल्या साध्या राहणीत सुखसमृद्धी व शांती मिळते, हा आशय या कवितेत सहजपणे नोंदवला आहे.
काव्यसौंदर्य : प्राप्त परिस्थितीत शुद्ध मनाने जगताना समाधान मिळते. खुल्या निसर्गात, जमिनीवर पहुडताना जे सुख मिळते, ते देवांच्या देवालाही मिळत नाही, असे प्रस्तुत ओळींत सांगितले आहे. माझे झोपडीत राहण्याचे सुख पाहून देवेंद्रही लाजतो. त्याला माझ्या सुखाचा हेवा वाटतो; कारण देवेंद्रालाही न मिळणारी शांती माझ्या झोपडीत विराजमान झाली आहे. माझ्या झोपडीत निरामय शांती वसत आहे, असे कवीला म्हणायचे आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : कवितेच्या आशयाला पूरक असा सैलसा 'ओवी' हा प्राचीन लोकछंद या कवितेत आहे. ओवी छंदात तीनही चरणांत यमक साधलेले असते प्रस्तुत रचनेचा सहजपणे तत्त्व बिंबवण्याचा गुण आहे. पैसा, दौलत, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत; परंतु गरिबाच्या मनातील निर्मळ भाव हा त्यास अभय देतो हा संदेश इतक्या सोप्या शब्दांत मांडला आहे की, ही ओवी सहज ओठात रुळते. गुणगुणावीशी वाटते. प्रत्येक ओवीचा शेवट- 'या झोपडीत माझ्या' असा केल्याने आशयाची घनता वाढते. तसेच 'या' हा शब्द एकाच वेळी सार्वनामिक विशेषण व क्रियापद या दोन्ही अंगांनी अर्थवाही झाला आहे.
View full question & answer