Question 14 Marks
$\quad$जमातवाद हे आपल्या देशाच्या ऐक्यापुढील एक गंभीर आव्हान आहे. संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. ब्रिटिशांनी आपल्या देशात जमातवादाचे बीज पेरले. आपल्या देशात विविध धर्मांचे लोक शतकानुशतकापासून गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. एखाद्या समाजात भिन्न-भिन्न धर्मांच्या लोकांचे वास्तव्य असणे व त्यांनी आपापल्या धर्माचा योग्य तो अभिमान बाळगणे यात वावगे काहीच नाही. पण जेव्हा या धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रूपांतर दुरभिमानात झाल्यावाचून राहत नाही. प्रत्येकाला मग आपलाच धर्म श्रेष्ठ आणि बाकीचे सर्व तुच्छ वाटतात. यातून धर्मांधता येते.
$\quad$धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे. धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतो. भिन्नधर्मीयांचा एकमेकांवरचा विश्वास उडतो. परस्परांविषयी त्यांना संशय वाटू लागतो. परधर्मीय देशबांधवांना शत्रू लेखले जाते. एकमेकांच्या सणासुदीच्या प्रसंगी एकत्र येणेही कमी होऊ लागते. नागरिक म्हणून सर्वांनी रास्त मागण्यांसाठी व हक्कांसाठी संघटित होणेही अशक्य होऊन बसते. धर्मांधतेमुळे भोवतालच्या घटनांकडे, माणसांकडे बघण्याची दृष्टीच कलुषित होऊन जाते.
प्रश्न :
(१) जमातवादाचा जन्म कशातून होतो ?
(२) समाजातील लोकांची मने केव्हा कलुषित होतात ?
(३) जमातवादाचे समाजावर होणारे परिणाम लिहा.

Answer
View full question & answer→(१) जमातवादाचा जन्म धर्मांधतेतून होतो.
(२) जेव्हा भिन्न धर्मीयांचा एकमेकांवरील विश्वास उडतो आणि ते धर्मांध होतात; त्या वेळी या धर्मांधतेतूनच समाजातील समाजातील लोकांची मने कलुषित होतात.
(३)जमातवादाचे समाजावर पुढील परिणाम होतात -
(१) आपलाच धर्म श्रेष्ठ आहे असे वाटून इतर धर्मीयांना तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती वाढते.
(२) परधर्मीयांविषयी संशय वाढीस लागून त्यांना शत्रू लेखले जाते.
(३) योग्य मागण्यांसाठी व हक्कांसाठी लोक संघटित होत नाहीत.
(४) एकमेकांवरील विश्वास उडून व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतो.