Question
ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.

Answer

  1. ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सान्निध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात.
  2. विषुववृत्ताच्या सान्निध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते. याउलट, ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
  3. ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे २५°से ते २८°से आढळते. या भागात उष्ण, दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते.
  4. ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी २००० मिमी, तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी १००० ते १२०० मिमी पर्जन्य पडते.
  5. ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
    उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे असते.
  6. अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्र कड्यामुळे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या अजस्र कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
  7. ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो.
  8. ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमान तुलनेने अधिक असते. हा प्रदेश 'पर्जन्यछायेचा प्रदेश ' किंवा 'अवर्षण चतुष्कोन' म्हणून ओळखला जातो.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

Image

पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर राेजगार निर्मिती कशी होते?
पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन

"नैसर्गिक वनस्पती व प्राणी" या पाठात दिलेली माहिती, आकृत्या नकाशे यांच्या आधारे माहिती भरा.

.क्र. वनांचा प्रकार गुणधर्म भारतातील प्रदेश ब्राझीलमधील प्रदेश
१. उष्ण कटिबंधीय वने १. रुंदपर्णी सदाहरित वृक्ष
२. निम वाळवंटी काटेरी वने

१.

२.

३. ‘सॅव्हाना’ १. तुरळक झुडपांसारखी झाडे/तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकारक गवत
४. उष्ण कटिबंधीय निम पानझडी १. मिश्र स्वरूपाच्या वनस्पती
५. गवताळ प्रदेश १. अर्जेंटिनातील 'पंपास' प्रमाणे गवताळ प्रदेश
ब्राझील व भारतामधील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती?
पुढील संकल्पना स्पष्ट करा.

अभिलेखागार

खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा.

बिहार, टोकॅटींन्स, पर्नाब्युकाे, अलाग्वास, पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्राँडे दो नॉर नॉर्ते, पराईबा, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पश्चिम आंध्रप्रदेश, रोराईमा, ॲमेझोनास, पश्चिम बंगाल, रिओ ग्राँडे दो सुल, सांता कॅटरिना, गोवा.

प्रदेश भारत ब्राझील
जास्त पावसाचे
मध्यम पावसाचे
कमी पावसाचे
टिपा लिहा:

सरस्वती महाल ग्रंथालय

आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल?
मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते?