Question
ब्राझील व भारतामधील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती?

Answer

ब्राझील व भारतामधील वनांचा र्हास होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
  • वाढते नागरीकरण-
  1. भारत व ब्राझील या दोन्ही देशांत औद्योगिक विकासामुळे नागरी लोकसंख्येत वाढ होत आहे.
  2. या नागरीकरणामुळे अनेक नवीन शहरांचा उदय व विस्तार होत आहे. शहरांच्या विस्ताराबरोबर तेथील सुविधांसंदर्भातील नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. उदा. भारतामध्ये नवीन शहरांचा विस्तार होत असता, तसेच शहरातील वाहतूक मार्गांचा विकास करण्यासाठी वृक्षतोड झाली आहे.
  • स्थलांतरित शेती-
  1. हा उदरनिर्वाह स्वरूपाचा शेतीप्रकार असून त्याकरता लागणारी जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून मोकळी केली जाते. त्यानंतर या मोकळ्या भूखंडावर काही वर्षे शेती केली जाते. जेव्हा या जमिनीचा कस घटून उत्पादन कमी होते तेव्हा ती जागा सोडून दुसऱ्या जागी शेतीसाठी वृक्षतोड करण्यात येते.
  2. या प्रकारच्या शेतीला ब्राझीलमध्ये 'रोका' म्हटले जाते, तर ईशान्य भारतात 'झूम' म्हटले जाते.
  3. अशा प्रकारच्या शेती पद्धतीमुळे वारंवार जंगलतोड केल्यामुळे वनांचा र्हास होत जातो.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

प्राच्यवादी इतिहासलेखन

ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.
टिपा लिहा.

अजस्र कडा

खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा.
न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे?
टिपा लिहा.

ॲमेझॉन नदीचे खोरे

भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
मंदिर स्थापत्य शैली नागर द्राविड हेमाडपंती
वैशिष्ट्ये
उदाहरणे
मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.