Question
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा. $m^2 - 11 = 0$

Answer

$m2- 11 = 0$
$\therefore m2-(\sqrt{11})^2=0$
$\therefore (m+\sqrt{11})(m-\sqrt{11})=0... [a2- b2= (a + b)(a - b)]$
जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने,
$\therefore m+\sqrt{11}=0$  किंवा $m-\sqrt{11}=0$
$\therefore \mathrm {m}=-\sqrt{11}$ किंवा $m=\sqrt{11}$
$\therefore$ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे $-\sqrt{11}$ आणि $\sqrt{11}$ आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खाली त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहेत. तर त्रिकोणाच्या मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक काढा.
$(4, 7), (8, 4), (7, 11)$
जर 52x + 65y = 183 आणि 65x + 52y = 168 असेल तर x + y = ?
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पहिल्या ओळीत एक झाड, दुसऱ्या ओळीत दोन झाडे, तिसऱ्या ओळीत तीन याप्रमाणे $25$ ओळींत झाडे लावली, तर एकूण किती झाडे लावली?
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. $0.6, 0.9, 1.2, 1.5,...$
बास्केटबॉल खेळाडू जॉन, वासिम व आकाश एका ठरावीक जागेवरून बास्केटमध्ये बॉल टाकण्याचा सराव करत होते. बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता $\frac{4}{5}$वसीमची 0.83 व आकाशची 58% आहे, तर कोणाची संभाव्यता सर्वांत जास्त आहे?
$15$ सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ $30$ चौसेमी असेल तर संबंधित वर्तुळकंसाची लांबी काढा.
एका त्रिकोणाचा पाया $9$ आणि उंची $5$ आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया $10$ आणि उंची $6$ आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.
A(4, 8) आणि B(5, 5) या बिंदूंना जोडणारी रेषा, C(2,4) आणि D(1,7) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला समांतर आहे हे दाखवा.
जर $x = 3$ हे $kx^2 - 10x + 3 = 0$ या समीकरणाचे एक मूळ असेल, तर $k$ ची किंमत किती?