Question
क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल?

Answer

क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ:
  1. माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी.
  2. स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे.
  3. क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली.
  4. क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतींचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे. याशिवाय, टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
भारतामध्ये नदयांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?
खालील आकृती मधील लोकसंख्येच्या घनतेविषयी भाष्य करा.

Image

तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा.

खालील दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून पुढील मुद्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा:

Image

(अ) निसर्गाचे चित्रण 
(ब) मानवाकृतींचे रेखाटन 
(क) व्यवसाय 
(ड) घरे.

पुढील उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

आकाशवाणी: स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १९२४ मध्ये ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ (आयबीसी) या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस’ (आयएसबीएस) असे नामकरण केले. ८ जून १९३६ रोजी या कंपनीचे नामकरण ‘ऑल इंडिया रेडिओ’ (एआयआर) असे झाले.
   भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ‘आकाशवाणी’ हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. ‘विविधभारती’ या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे २४ भाषा आणि १४६ बोलीभाषांमध्येकार्यक्रम र्य सुरू झाले. अलीकडच्या काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. उदा., रेडिओ मिर्ची.

  1. आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते?
  2. IBC चे नामकरण काय झाले?
  3. विविधभारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर हाेतात?
  4. आकाशवाणी हे नाव कसे पडले?
उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो?
इंटरनेटच्या मदतीने ब्राझीलिया व भोपाळ या खंडीय स्थान असलेल्या ठिकाणांच्या वार्षिक सरासरी तापमानाची माहिती मिळवा व ती आलेखाद्वारे स्पष्ट करा.
लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.
कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा