पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. पहिला पाऊस पडतो तेव्हा सगळीकडे गारवा पसरतो. झाडांना नवीन हिरवेपणा येतो आणि हवेत गोड सुवास दरवळतो. लहान मुले पावसात भिजायला बाहेर धाव घेतात. काहीजण कागदी होड्या करून पाण्यात सोडतात.पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचतं, चिखल होतो आणि कधी कधी सर्दी-खोकलाही होतो, पण तरीही पावसात भिजण्यात वेगळीच मजा असते. आई गरम गरम भजी, पकोडे करते आणि आम्ही सगळे मिळून खिडकीत बसून पाऊस पाहतो.
पावसामुळे शेतीला खूप उपयोग होतो. शेतकरी आनंदाने शेतीची कामं सुरू करतात. आपल्यासाठी धान्य, भाजीपाला, फळं याचे उत्पादन होते. म्हणून पावसाळा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे.