पर्यावरण म्हणजे आपले जीवन, आपला श्वास. निसर्गाने आपल्याला हवा, पाणी, अन्न, झाडे, प्राणी यांचं अनमोल देणं दिलं आहे. परंतु आजच्या यांत्रिक आणि औद्योगिक जीवनशैलीमुळे आपण पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहोत. झाडांची बेसुमार तोड, पाण्याचा अपव्यय, प्लास्टिकचा अति वापर, ध्वनी आणि वायू प्रदूषण यामुळे पर्यावरण असंतुलित होत आहे.
पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. आपण झाडे लावली पाहिजेत, पाणी वाचवले पाहिजे, प्लास्टिकऐवजी कागद वा कापडी पिशव्या वापरल्या पाहिजेत. शाळांमध्ये पर्यावरण दिन साजरा केला जातो. आमच्या शाळेत आम्ही वृक्षारोपण करत असतो. पर्यावरण वाचवण्यासाठी लोकांनी स्वतः पुढे यावे लागेल.
आपण जर आज पर्यावरणाचे रक्षण केले नाही, तर उद्या आपले अस्तित्व धोक्यात येईल. म्हणूनच ‘पर्यावरण वाचवा – जीवन वाचवा’ हे ब्रीद प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. शुद्ध पर्यावरणातच आरोग्यपूर्ण जीवन शक्य आहे.