Question
पुढील विषयासाठी स्व-परिचयपत्र तयार करा :
Image

Answer

दि. ६ ऑगस्ट २०××
प्रति,
मा. श्री. गजानन शिंदे,
क्रीडा विभाग प्रमुख,
अभिनव विद्यालय, लातूर.

विषय: आंतरशालेय क्रीडास्पर्धेतील कबड्‌डी संघात प्रवेश मिळण्याबाबत.

महोदय,
आपल्या विदयालयाच्या मैदानात दरवर्षी आंतरशालेय क्रीडास्पर्धांचे आयोजन केले जाते. या वर्षीही क्रीडास्पर्धांचे आयोजन केल्याचे पत्रक मी शाळेच्या काचफलकात वाचले. मी गेली तीन वर्षे शाळेच्या कबड्डी संघातून सातत्याने खेळत आहे. या वर्षी मी शाळेच्या कबड्डी संघाचा संघनायक आहे. दिनांक २६, २७ व २८ डिसेंबरला होणाऱ्या आंतरशालेय क्रीडास्पर्धांसाठी आपल्या विद्यालयाचा कबड्डी संघ तयार केला जात आहे. या संघात मला प्रवेश मिळावा म्हणून हा अर्ज पाठवत आहे. माझा स्व-परिचय पुढे देत आहे.
                                          

स्व-परिचय

(१) संपूर्ण नाव 

: वीरेन शंकर लाभसेटवार

(२) पत्ता 

: , विश्रामयोग, घनतोली, नागपूर ४४० ०१२.

(३) संपर्क क्रमांक

: XXXXX७८९

(४) जन्मतारीख 

: १६ जून २०××

(५) उंची व वजन 

: उंची: १५५ सेमी.      वजन : ५५ किलो.

(६) शैक्षणिक पात्रता 

: इयत्ता ९वीमध्ये शिकत आहे.

(७) इतर आवडणारे खेळ

: टेनिस, क्रिकेट, फुटबॉल, लगोरी.

(८) प्राप्त केलेले वश 


   • मी शाळेच्या कबड्डी संघाचा कर्णधार आहे.
   • आमच्या संघाने काही सामन्यांमध्ये यश मिळवले आहे.
   • व्यक्तिशः मला अनेक चषक मिळाले आहेत.
   • मधल्या फळीतला कुशल खेळाडू म्हणून माझा लौकिक आहे.
   • गेली तीन वर्षे मी सलगपणे आपल्या शाळेच्या संघातून खेळत आहे.


आपला नम्र,
वीरेन लाभसेटवार
४, विश्रामयोग, धनतोली,
नागपूर - ४४० ०१२.
ई-मेल: virlabh@xxxx.com

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free