Question types

उपयोजित लेखन question types

19 questions across 8 question groups — pick any mix to generate a मराठी - कुमारभारती paper with step-by-step answer keys.

19
Questions
8
Question groups
5
Question types
Sample Questions

उपयोजित लेखन questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

   माणूस झाडावरून जमिनीवर उतरला आणि याच सुमारास तो दोन पायांवर चालू लागला, त्यामुळे त्याचे हात मक्ष्य शोधण्याकरिता मोकळे राहू लागले. माणसाची दृष्टी चांगली होती, हाताची ठेवण वैशिष्ट्यपूर्ण होती आणि या सर्वांच्या जोडीला बुद्धीचे वरदान होते. परिणामतः माणसाने भाषा शोधलौ, हत्यारे निर्माण केली, अग्नीचा शोध लावला, चाकाचा शोध लावला, लिपीची निर्मिती केली. माणसाचे पृथ्वीवरील अस्तित्व बु‌द्धीच्या सामध्यांमुळे टिकले. कदाचित वेगळ्या परिस्थितीत माणसाऐवजी इतरही वेगळ्या रितीने उत्क्रांत झाले असते, बुद्धिमान झाले असते, तर त्यांचे अधिराज्य येथे निर्माण झाले असते. कदाचित देवमासे वा बबून यांनी पृथ्वी व्यापली असती. उत्क्रांतीचे रहस्य अजूनही पूर्णपणे समजलेले नाही. आपल्याला फक्त येथील उत्क्रांतीची माहिती आहे.    अन्य ग्रहांवर जे प्राणी निर्माण झाले असतील ते आपल्यापेक्षा सर्व दृष्टींनी निराळे असतील. कदाचित मॅच्या पेशींएवजी तेथे अतिवाहक पेशी असतील, कदाचित तेथील मेंदूवा अवयवांशी थेट संपर्क/संबंधही नसेल, रेडिओ लहरीं‌द्वारा मेंदू आपल्या अवयवांना आज्ञा देत असेल, आपल्यापेक्षा ते प्राणी बुद्धिमान असतील. आपल्या मेंदूत १०० इतके चेतापेशींचे जोड (कनेक्शन) आहेत. परग्रहांवरील सजीवांमध्ये ही संख्या १०० इतकी प्रचंड असू शकेल. अशा सजीवांकडून बरेच काही शिकता येईल.
View full solution
   अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नाना तन्हांनी वापरले. त्यांची मांडीकुंडी केली. औते-हत्यारे बनवली आणि त्यांचे दागदागिने देखील घडवले, खडक कोरून किंवा दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागवल्यानंतर त्याला आपल्या सर्जनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहवले नाही. फुरसद मिळाली तशी तो लेणी खोद् लागला, शिल्पे कोरू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्पे आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि त्याच्या सर्जनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून त्याने तो पूजला.
View full solution
   आपल्या कामाची आखणी करणे, किती वेळात काम संपेल त्याचे नियोजन करणे आणि ठरवल्याप्रमाणे काम पार पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे 'वक्तशीरपणा' होय. औदयोगिकीकरण आणि शहरीकरण यांमुळे आता तर जीवन खूप गतिमान व गुंतागुंतीचे बनले आहे. त्यामुळे सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही. वेळेत कामे पार पाडली नाहीत, तर आपण फक्त आपलेच नुकसान करतो असे नव्हे, तर आपल्याबरोबर आपण इतरांचेही नुकसान करतो. कल्पना करा की, बसच्या ड्रायव्हरने आळस करून एक तास उशिरा बस नेली, तर त्याच्या आळसामुळे केवळ त्याचा एक तास वाया जातो, असे नसून, त्याच्याबरोबर बसमधील पन्नास-साठ माणसांचा प्रत्येकी एक तास वाया जातो. त्या एका तासात करण्यासाठी म्हणून त्या माणसांची जी कामे ठरलेली असतात, ती एकतर रद्द होतात किंवा पुढे ढकलली जातात. या कामांवर अवलंबून असणाऱ्या इतर माणसांचेही मग नुकसान होते. म्हणून आपल्या कामांचे नियोजन करून ती वेळच्या वेळी पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा. हाच वक्तशीरपणा होय. वक्तशीरपणा न पाळणे म्हणजे स्वतःच्या पायावर घोंडा पाडून घेणे होय.
View full solution
   आपले जीवन सुखी, समाधानी आणि यशस्वी असावे असे प्रत्येक माणसाला वाटत असते; पण तसे होत नाही, उलट सर्वत्र पाहिले असता दुःख मणभर, सुख कणघर' असाच अनुभव येतो; पण असे का होते, याचा विचार माणूस करीत नाही. माणसाच्या जीवनात सर्व समस्या निर्माण होतात, त्याच्यामागे 'अहंकार' हा राक्षस असून तोच सर्व समस्यांना कारणीभूत असतो. हा अहंकार डोळ्यांना दिसत नाही. तो स्वतःजवळ आहे हे कळतही नाही, कारण तो सूक्ष्म स्वरूपातही असतो आणि स्थूल स्वरूपातही असतो. जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी अहंकार आहे तोपर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होणे कठीण व समाधान मिळणे त्याह्नही कठीण. माणसे अहंकाराचा फुगा कळत-नकळत फुगवतच असतात. अज्ञानाला आलेला आकार म्हणजे अहंकार, या अहंकाराचा नाश झाल्याशिवाय माणसाला सत्याचा व सुखाचा साक्षात्कार होणे शक्य नाही, म्हणून माणसाला सुखी व समाधानी जीवन जगायचे असेल तर अहंकारावर लक्ष केंद्रित करून त्याला ताब्यात ठेवणे शिका.
View full solution

पुढे दिलेल्या उताऱ्याचा स्वतःच्या शब्दांत एक तृतीयांश सारांश लिहा :
     मैत्रीमध्ये सहवासाला काही महत्त्व असतेच. जुन्या लोणच्यासारखी जुनी मैत्री मुरत जाते. एकमेकांचे स्वरूप एकमेकांना बरेचसे कळलेले असते. त्यामुळे अशा मित्रासमोर किंवा मैत्रिणीसमोर आपली विशिष्ट प्रतिमा उभी करण्याची गरज राहत नाही. आपण जसे आहोत तसे, निखळपणे, निर्भरपणे आपण तिथे प्रकट होतो. या साध्या स्वाभाविक संबंधांतून आपल्याला एक स्थैर्य लाभते, भोवतालच्या फसव्या, अस्थिर, धूर्त, मतलबी जगात मैत्रीची अशी स्वाभाविक, सहज स्थाने म्हणजे आपला एक मोठा आधार असतो. तिथे पायाखालची जमीन ही जमीनच असते. मयसभेप्रमाणे जमीन समजून पाय टाकावा, तर तो पाण्यात खोल जावा आणि पाणी समजून पाऊल टाकायला जावे, तो टणक, खडबडीत जमीन लागावी, असे या मैत्रीत घडत नाही. म्हणून मैत्रीचे असे एखादे तरी ठिकाण माणसाला हवेच.

-शांता शेळके (आनंदाचे झाड)

View full solution
     प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला. आता सु‌ट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते. प्रकाशला अन्वरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिट्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चि‌ट्ठी वाचायला घेतली आणि....
View full solution
बालमित्र चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील चि. अमित/कु. अमिता घोलप यास/हीस राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्याची/तिची मुलाखत घ्या.
View full solution
पुढील बातमी वाचा :
Image
वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होता, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
View full solution

Generate a उपयोजित लेखन paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App