Question

पुढील विषयावर बातमीलेखन करा :

Image

Answer

 ५०० कोटी प्रकाशवर्षे अंतरावरील आकाशगंगेचा शोध !

- डॉ. जयंत नारळीकर

(आमच्या प्रतिनिधीकडून)

वसई, दि. १ मार्च: हजारो वर्षांपासून माणूस विश्वाचा शोध घेत
आहे. नुकतेच त्याने एक मोठे पाऊल टाकले आहे. ५०० कोटी प्रकाशवर्षे अंतरावरील आकाशगंगेचा नुकताच शोध लागला आहे. आता माणसाला अंतराळातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे. सर्वांना थक्क करून टाकणाऱ्या या शोधाची माहिती व त्याचे होणारे फायदे यांची थरारक हकिकत डॉ. जयंत नारळीकर यांनी जागतिक विज्ञानदिन सोहळ्यानिमित्त सांगितली आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले.
        प्रसंग होता विज्ञानदिन सोहळ्याचा. वसईच्या नवमहाराष्ट्र विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त जागतिक कीर्तीचे अंतराळ संशोधक डॉ. जयंत नारळीकर यांचे व्याख्यान झाले. प्रमुख उपस्थिती होती वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर श्री. मोरेश्वर पाटील यांची. त्या वेळी आपल्या आकाशगंगेची व सूर्यमालिकेची माहिती देणारा एक 'लेझर शो' सादर करण्यात आला. त्या 'लेझर शो'च्या साहाय्याने जयंतरावांनी अद्भुत विश्वाची झलक दाखवली. खूप माहिती सांगितली. ती सर्व माहिती ऐकून श्रोते रोमांचित झाले होते. कार्यक्रमानंतर सर्वजण अनेक वैज्ञानिक संकल्पना डोक्यात घोळवत घरी परतले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free