Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट — मराठी STD 8 — Question
Maharashtra BoardEnglish MediumSTD 8मराठीChapter 5 घाटात घाट वरंधाघाट2 Marks
Question
तुम्ही भेट दिलेल्या एका किल्ल्याची माहिती दया.
✓
Answer
आमच्या शाळेच्या सहलीत रायगड या किल्ल्यावर जाण्याचा योग आला. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रिच्या पर्वतरांगांमध्ये आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासात त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाचे स्थान व महत्त्व पाहून याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेकही याच किल्ल्यात झाला. सागरी दळणवळणासही हा किल्ला उपयुक्त होता. अशा या रायगडावर फिरताना सगळा इतिहास समोर उभा राहिला. रायगडाचं जुनं नाव रायरी होतं. या गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरूज, उत्तरेकडच टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला शिवरायांचा पुतळा पाहून आम्हा सगळ्यांनाच एक स्फुरण चढले. अशा प्रकारे त्या भेटीत रायगडाचा सहवास घडला.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.