तो अंग झटकून उभा राहिला. तोंड वर करून कावळ्याकडे बघून म्हणाला, "कावळे दादा, कावळे दादा, अहो! किती दिवसांनी दर्शन दिलेत". कावळा गंमत म्हणून कोल्ह्याकडे कडे बघू लागला. तसा कोल्हा पुन्हा म्हणाला. "अहो कावळेदादा, काय तुझे रूप, किती छान-छान तुमचे पंख, किती बळकट तुमचे पाय, किती बाकदार, शानदार तुमची चोच आणि हो तुमचा गळा, तुमचा आवाज किती किती मधुर, किती गोड आहे. किती दिवसात तुमचं गाणं ऐकलं नाही! खरंच कावळेदादा, म्हणा ना एक सुंदरगाणे. कावळेदादा एक गाणं म्हण ना रे." कोल्हयाने पुन्हा पुन्हा विनंती केली. कावळा विचारात पडला. प्रथमच त्याची कोणी इतकी स्तुती केली होती. कावळा खूश झाला. कोल्हयाने ओळखले थोडी आणखी स्तुती केली तर कावळा नक्की तोंड उघडेल.
कोल्ह्याने आता कावळ्याने गाणे गावे म्हणून हट्टच धरला. एवढी स्तुती ऐकून कावळ्यालाही राहवले नाही. त्याने गाणे म्हणण्यास सुरुवात केली आणि 'साऽऽरे' म्हणण्याच्या आधीच तोंडातला मासा खाली पडला. भुकेलेल्या कोल्हयाचे काम फत्ते झाले. त्याने तो मासा उचलला व खाऊन टाकला. कावळा बिचारा गातच होता. पण कोल्हा होता कुठे ते गाणे ऐकायला ! तो तर केव्हांचा पळून गेला होता दुसऱ्या मुर्खाच्या शोधात.
तात्पर्य : खोट्या स्तुतीला फसू नये. स्वार्थासाठी लबाड लोक खोटी स्तुती करतात. खोट्या स्तुतीवर विश्वास ठेवू नये.
शीर्षक: लबाड कोल्हा, मुर्ख कावळा.
पंचवटीजवळ एक जंगल होते. या जंगलात एक कोल्हा राहत होता. दुसऱ्याच्या शिकारीवर ताव मारणे हा त्याचा उद्योग होता. साध्याभोळ्या प्राण्यांना गोड बोलून फसवणे व ठार मारणे हा त्याचा छंद होता. जंगलातील प्राण्यांना त्याचा स्वभाव कळला होता. आता सर्व प्राणी कोल्हह्यापासून चार हात लांब राहणे पसंत करीत.
यामुळे एकदा काय झाले. कोल्हा दोन दिवस उपा- शी राहिला. त्याला शिकार मिळाली नाही. सगळे प्राणी सावध होते. कोल्हा दिसला की लांब राहत. त्याला दोन दिवसांत अन्नाचा एक कणही मिळाला नाही. आज काही झाले तरी शिकार करायचीच असे त्याने ठरविले. दिवसभर जंगलात शिकारीसाठी तो वणवण फिरला. वणवण भटकून थकल्यानंतर तो विश्रांतीसाठी नदीजवळच एका झाडाखाली बराच वेळ बसला नंतर त्याने वर पाहिले. एक कावळा तोंडात भला मोठा मासा घेऊन बसला होता. कावळा आता तो ताजा मासा खाणार आणि आपण उपाशीच राहणार काय करावे ? कसे करावे ? म्हणजे तो मासा आपल्याला मिळेल. तो विचार करू लागला आणि एकदम त्याला एक युक्ती सुचली सुद्धा.
