Questions

पत्र लिहा। [6M]

Take a timed test

6 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 16 Marks
खालील निवेदन वाचा व संबंधित व्यक्तीस विनंती करणारे पत्र लिहा.
Image
Answer
दिनांक १७ जुलै, २०१८
प्रति,
मा. मुख्याध्यापक,
केळकर विद्यामंदिर,
ता. राजापूर, जि. रत्नागिरी.

विषय : गरीब विद्यार्थी फंडातून गणवेश व शैक्षणिक साहित्य मिळण्याबाबत विनंती अर्ज...

आदरणीय गुरुवर्य,
      सप्रेम नमस्कार,
      मी अ.ब.क. आपल्या शाळेत इयत्ता '८ वी ब' मध्ये शिकत आहे. माझ्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न फारच कमी आहे. त्यामुळे मला शाळेचा गणवेश व शैक्षणिक साहित्य विकत घेणे अशक्य आहे.
      मला वर्गशिक्षकांकडून असे कळले की, आपल्या शाळेतून गरीब विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्यासाठी सहाय्य केले जाते. तरी मला शाळेकडून तो लाभ मिळावा, ही विनंती.
      कळावे, तसदीबद्दल क्षमस्व !
आपली विद्यार्थिनी,
अ.ब.क.
पितृसदन, मु.पो. राजापूर,
ता. राजापूर, जि. रत्नागिरी.
View full question & answer
Question 26 Marks
खालील जाहिरात वाचा व संबंधितांस मागणी पत्र लिहा.
Image
Answer
दिनांक २७ जानेवारी, २०१८.
प्रति,
मा. व्यवस्थापक,
ज्ञानसागर ग्रंथ भांडार,
महात्मा गांधी रोड, दादर (प.),
मुंबई - ४०० ०२८.

विषय : शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी.

माननीय महोदय/महोदया,
      सप्रेम नमस्कार.
      मी अ. ब. क., 'सरस्वती विद्यालय' या शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मुख्याध्यापकांच्या संमतीने हे पत्र लिहीत आहे. आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी खालील पुस्तकांची आवश्यकता आहे. तरी कृपया ती पुस्तके शाळेच्या पत्त्यावर त्वरीत पाठवून द्यावीत. सोबत पुस्तकांचे देयक (बिल) पाठवावे. जेणेकरून पुस्तकांची रक्कम त्वरीत देण्याची व्यवस्था करता येईल.

पुस्तकांची यादी पुढीलप्रमाणे :
क्र. पुस्तकाचे नाव लेखकाचे नाव प्रती
(i) शिवछत्रपती श्री. बाबासाहेब पुरंदरे ०५
(ii) बटाट्याची चाळ पु. ल. देशपांडे १०
(iii) स्वामी रणजित देसाई ०७
(iv) यश तुमच्या हातात शिव खेरा ०५
वरील पुस्तके विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे कृपया पुस्तकांवर योग्य ती सवलत द्यावी, ही नम्र विनंती.
View full question & answer
Question 36 Marks
खालील सूचना फलकावरील निवेदन वाचा व संबंधित व्यक्तीचे अभिनंदन करणारे पत्र मित्र/मैत्रीण या नात्याने लिहा.
Image
Answer
दिनांक : ५ जानेवारी, २०१८.
प्रिय मैत्रिण सानिका,
     सप्रेम नमस्कार,
     दोन दिवसांपूर्वी तुझे पत्र मिळाले. वाचून खूप आनंद झाला. माझी काळजी करू नकोस. मी इकडे मजेत आहे. माझा अभ्यास व्यवस्थित चालू आहे. घरचेही सुखरुप आहेत.
      काल आपल्या शाळेच्या सूचनाफलकावरील मुख्याध्यापकांचे निवेदन वाचले. कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाड यांच्यातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत जिल्हा स्तरावर तुझा प्रथम क्रमांक आल्याचे समजले. खूप आनंद झाला. तुझे मनापासून अभिनंदन !
      तू नेहमी अनेक चित्रकला स्पर्धामध्ये भाग घेत असतेस, त्यात तू पहिलीच असायचीस, याही स्पर्धेत तू प्रथम क्रमांक मिळवलास 'मैत्रीण' म्हणून तुझा खूप अभिमान वाटतो. यापुढेही तू असेच यश संपादन करावे व आपल्या शारदा विद्यालयाचे नाव रोशन करावे, अशी अपेक्षा करते. तुला भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा !
      काका व काकूंना नमस्कार, छोट्या राजूला गोड पापा.
       कळावे, लोभ असावा.
तुझी मैत्रीण,
अ.ब.क.
मातृसदन,
मु.पो. आंबिवली,
ता. महाड, जि. रायगड.
View full question & answer
Question 46 Marks
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
Image
Answer
दिनांक : ३० एप्रिल, २००८
प्रति,
मा. संचालक,
श्री. विनय गायकवाड,
२, सोमवार पेठ, कराड.

विषय :
सुलेखन वर्गात प्रवेश मिळण्याबाबत

माननीय महोदय,
      सप्रेम नमस्कार,
      मी अ.ब.क. शिवछत्रपती विद्यालय कराड या शाळेत इयत्ता ९ वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. पुढील शैक्षणिक वर्षात मी इयत्ता १० वी मध्ये जाणार आहे. माझे मराठी विषयाचे अक्षर म्हणावे तसे वळणदार नाही. मला येत्या शैक्षणिक वर्षात चांगले गुण हवे आहेत. तेव्हा आपण आपल्या मराठी भाषेच्या लेखनासाठी काय उपाय करू शकतो. या विचारात असतानाच आज अचानक आमच्या शाळेत आपल्या अ‍ॅकॅडमी तर्फे येत्या उन्हाळ्याच्या मे महिन्यात १ मे ते ३१ मे या कालावधीत सुलेखन वर्गाचे आयोजन केल्याची जाहिरात पाहिली.
       ही माझ्यासाठी एक सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. आता निश्चितच माझे हस्ताक्षर चांगलेच सुधारेल अशी आशा वाटते. तेव्हा मी आपणांस विनंती करते की, आपण मला या वर्गात प्रवेश देऊन माझे
अक्षर सुधारण्याची संधी द्यावी.
कळावे, तसदीबद्दल क्षमस्व.
आपली कृपाभिलाषी,
अ.ब.क.
शिवछत्रपती विद्यालय,
कराड.
View full question & answer
Question 56 Marks
चांगला उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Answer
ज्ञानेश्वरी विद्यालय,
गोकर्ण पथ, औंध.
दिनांक : २५ जून, २०१८
प्रति,
माननीय व्यस्थापक
हिरवाई ट्रस्ट,
बालोद्यान मार्ग,
तळेगाव, दाभाडे.

विषय : आपण राबवलेल्या चांगल्या उपक्रमाबाबत अभिनंदन.

माननीय महोदय,
      सप्रेम नमस्कार,
     'हिरवाई' ट्रस्ट आपले त्रिवार अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! दिनांक ५ जून 'जागतिक पर्यावरण दिन' या दिवसाचे औचित्य साधून आपण आपल्या ट्रस्ट कडून 'झाडे लावा..... झाडे जगवा' या बीद्र वाक्याचे पालन करत आपले शहर व शहराबाहेर विविध खेडेगावात मोफत रोपांचे वाटप केले. लोकांना पर्यावरणाचे मोल समजून सांगून आज पर्यावरणाचा समतोल कसा साधावा ? याची माहिती देऊन आजच्या काळात झाडे लावणे का आवश्यक आहे हे पटून दिले व लोकांना झाडे लावण्यास प्रोत्साहित केले.
      या आपल्या पर्यावरणाच्या जागृतीबाबत व अशा प्रकारच्या राबवलेल्या कार्यक्रमाबाबत मी अ.ब.क. ज्ञानेश्वर विद्यालय या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपले अभिनंदन करण्यासाठी हे पत्र आपणास लिहित आहे. असेच विविध सामाजिक उपक्रम आपल्या हातून पूर्ण होवोत ही सदिच्छा.
आपला नम्र,
अ.ब.क.
विद्यार्थी प्रतिनिधी,
ज्ञानेश्वर विद्यालय,
गोकर्ण पथ, औंध.
View full question & answer
Question 66 Marks
शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा.
Answer
 
दिनांक : ५ जून, २०१८
प्रति,
मा. व्यस्थापक
हिरवाई ट्रस्ट,
बालोदयान मार्ग,
तळेगाव, दाभाडे.

विषय : शाळेतील उद्यानासाठी रोपांची मागणी.

माननीय महोदय,
       सप्रेम नमस्कार,
       मी अ.ब.क. ज्ञानेश्वरी विद्यालय या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मुख्याध्यापकांच्या परवानगीने हे पत्र लिहित आहे. प्रतिवर्षी आमची शाळा विविध उपक्रम राबवते. या वर्षी आम्ही शाळेच्या सुरुवातीलाच (५ जून) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शाळेच्या उद्यानात रोपे लावण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठीचे सर्व नियोजन आम्ही आमच्या मुख्याध्यापक व गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. आम्हांला काही रोपांची आवश्यकता आहे.
      शाळेच्या उद्यानात जी रोपे लावायची आहे त्याची यादी मी खाली देत आहे.
क्र. रोपे संख्या
(१) गुलाब ३०
(२) मोगरा २०
(३) शोभेची झाडे २०
(४) शेवंती २०
(५) लिली १०
        शाळेतील उद्यानासाठी ही रोपे हवी आहेत. आपण ती लवकरात लवकर पाठवावीत ही विनंती कळावे, तसदीबद्दल क्षमस्व, आपला कृपाभिलाषी,
 अ.ब. क.
(विद्यार्थी प्रतिनिधी)
View full question & answer