Questions

पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा :

Take a timed test

6 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 13 Marks
आकृतिबंध पूर्ण करा :
तुलना करा :
भारतामधील धुकेलंडनमधील धुके
(१)(१)
(२)(२)
(३)(३)
 
Answer
भारतामधील धुकेलंडनमधील धुके
(१) मनाला सुखद संवेदना देते.(१) लंडनचे धुके औरच आहे.
(२) धुक्याचा पडदा थोडा वेळ राहतो.(२) वर्षाचे दहा दिवससुद्धा आकाश निरभ्र नसते.
(३) सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते.(३) काळसर पांडुरके धुक्याचे छत लंडन शहरावर पसरते.
  
View full question & answer
Question 23 Marks
इंग्लंडमधील हिवाळा आणि भारतातील हिवाळा यांची तुलना करा.
Answer
इंग्लंडमध्ये हिवाळ्यात कित्येक आठवडे संधिप्रकाशा- इतकाच उजेड असतो. भारतात मात्र स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. भारतातील काही भागांत तर अत्यंत प्रखर, तीव्र उजेड असतो; तर काही भागांत उजेड भरपूर प्रमाणात असतो, पण तापमान कमी असते. इंग्लंडमध्ये अर्धवट उजेडात प्रकाश व सावली यांचा अभाव आढळतो. भारतात मात्र, माणसे, प्राणी व वाहने सावलीसोबतच चालत, धावत असतात. इंग्लंडमध्ये पर्णहीन वृक्षांची सावली खालच्या हिरवळीवर पडत नाही. भारतामध्ये झाडाखालच्या दाट सावलीत प्रकाशाचे गोल कवडसे चमकत असतात. सावली पडावी इतका प्रकाश इंग्लंडमध्ये महिनोन्महिने पडत नाही. त्यामुळे वस्तूंवर छायाप्रकाशाचे खेळ दिसत नाहीत. पण भारतात प्रत्येक वस्तूची एक बाजू प्रकाशमय व दुसरी बाजू सावलीची असते. असा इंग्लंडमधील हिवाळा व भारतातील हिवाळा यांत फरक दिसून येतो.
View full question & answer
Question 33 Marks
तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
Answer
ऐन हिवाळ्यात आम्ही काही मित्र पाचगणीला गेलो होतो. तेथील आमच्या तीन दिवसांच्या मुक्कामात एकदाही आम्हांला स्वच्छ आकाशाचे दर्शन झाले नाही. सर्व परिसराला धुक्याने जणू बाहूत कवटाळले होते. झाडे धुक्याचे पांघरूण घेऊन पेंगत होती. तोंडातून फुंकर मारली की धुक्याची धुरासारखी वलये उमटत होती. आम्ही रस्त्यावरून हिंडत असताना एक जादू झाली. अवतीभवती शिरिषाची विस्तारलेल्या फांट्यांची खूप झाडे होती. अचानक क्षणभर ढगातून सूर्याची फिकट कोवळी किरणे धुक्याने लपेटलेल्या झाडातून खाली उतरली नि झाडाच्या पायथ्याशी उन्हाच्या गोल-गोल चकत्या उमटल्या. मला अशोक बागवे यांच्या कवितेची एक ओळ आठवली- 'सावलीच्या टोपलीत उन्हाचे गजरे। मखमलीची झीळ त्याला हिर्वळे दर्वळे'. धुक्यातील दिवसांतील हा क्षण माझ्यासाठी केवळ मोलाचा ठरला.
View full question & answer
Question 43 Marks
तुमच्या आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Answer
वर्षाऋतू किंवा पावसाळा हा माझा अत्यंत आवडता ऋतू आहे. तापलेल्या मातीवर पावसाचा शिडकावा झाला की मातीचा सुगंध येतो. सारी सृष्टी न्हाऊन निघते. डोंगरदऱ्यांत पाणी खळाळते. झाडे अंघोळ करून स्वच्छ होतात. नदीनाले भरभरून वाहू लागतात. गुरेढोरे, पशुपक्षी यांना पाणी मिळते. शेतकरी आनंदित होतात व नांगरलेल्या शेतात पेरणी करायला उत्सुक असतात. मुले आनंदाने बागडतात. सर्वत्र हिरवेगार होते. सृष्टी आपले रूप पालटते. चराचरावर आनंदाची लकेर घुमते, कवी, लेखकांना नवनवीन कल्पना सुचतात. खरेच! पाऊस हा नवसर्जनाचा ऋतू आहे!
View full question & answer
Question 53 Marks
'हिवाळ्यातील एक क्षण,' तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.
Answer
गेल्या वर्षी आम्ही सर्व कुटुंबीय ऑक्टोबर महिन्यात चारधामच्या यात्रेला गेलो होतो. गंगोत्रीच्या काठावर आम्ही वस्ती केली होती. रात्र असल्यामुळे त्या परिसराची कल्पना नव्हती. पहाटेच मला जाग आली. बाहेर थंडी होती. उबदार शाल लपेटून मी बाहेर आलो. गच्च धुक्याची चादर लपेटलेली झाडे नि गंगेच्या धारेवर बर्फाची ओढणी अंथरली होती. ऑक्टोबर महिना असल्यामुळे पर्वतावरील बर्फ वितळले होते. पण शिखराशिखरांवर बर्फाचे भलेमोठे पुंजके होते. मी त्यांच्याकडे भान हरखून पाहत होतो. इतक्यात एक सूर्याचा किरण शिखरावर पडला नि तिथला बर्फ सोन्याच्या रंगाने तळपला. हे दृश्य केवळ विलोभनीय होते. एक क्षणभरच हे अलौकिक सौंदर्य उमटले नि लुप्त झाले. हिवाळ्यातील हा अविस्मरणीय क्षण मी आयुष्यभर विसरू शकत नाही.
View full question & answer
Question 63 Marks
इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा.
Answer
इंग्लंडमध्ये काळसर पांढुरक्या धुक्याचे छत सर्व शहरावर पसरलेले असते. कोळशावर चालणारे लंडनमधले हजारो कारखाने व कोळशावर चालणाऱ्या घरांतील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर सोडत असतात. घरात अनवाणी चालले की पाय काळे होतात. झाडाला हात लावला की हात काळे होतात. अशा धुरकट वातावरणात धुके पसरले की कोळशाचे कण दिसू लागतात. काळोख डोळ्यांना दिसतो व हातात धरता येतो. आपण हवेच्या आवरणाच्या तळाशी आहोत, याचा प्रत्यक्ष अनुभव त्या धुक्यात येतो. समुद्राच्या तळाशी होणाऱ्या जीवांच्या घुसमटीची कल्पना येते. ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी आपटतात. रस्त्यांवर वाहनांचे अपघात होतात. मुले रस्ता चुकतात. अशा प्रकारे तेथील जनजीवन विस्कळीत होते.
View full question & answer