Questions

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

Take a timed test

2 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 18 Marks
1. आकलन कृती
(१) आकृती पूर्ण करा :
Image

हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई

हरवत चाललाय किराणा आणि भुसार
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर
लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा
निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट
कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली
मागच्या धगीवर रटरटणारी आमटी
राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर

बोलाचालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली
सुटीत आता खेळत नाहीत मुलं
विटीदांडू आणि लगोऱ्या
थांबून गेलाय त्यांचा दंगा,
आट्यापाट्या आणि पिंगा
परकऱ्या मुली खेळत नाहीत आता
आधीचे मातीतले खेळ

पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर
बघत क्रिकेटची मॅच
आणि उलगडत क्राइम-थ्रिलर

लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते
शब्द बापुडे केवळ वारा
तसे विरून जातायत

मी वाचवतोय माझी कविता
आणि माझी आई
आणि माझी बोली
आणि माझी भूमी
कवितेसोबत

2. आकलन कृती

(१) चौकटी पूर्ण करा :
(i) गॅसशेगडीवर राखेसहित दुरावत गेलेली  - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 
(ii) विस्तवासोबत निघून गेलेली - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 
(iii) संभाषणातून निघून चाललेली - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 
(iv) वान्यावर विरून गेलेले - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 

3. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ

(१) पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा :
• लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते
  शब्द बापुडे केवळ वारा
  तसे विरून जातायत

4. स्वमत :
• 'शब्द बापुडे केवळ वारा' या काव्यपंक्तीतील आशवसौंदर्य शब्दबद्ध करा.
Answer
1. आकलन कृती
(१) आकृती पूर्ण करा :
Image

2. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) रटरटणारी आमटी
(ii) कल्हईची झिलई
(iii) आईची बोली
(iv) बापुडे शब्द

3. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ

(१) पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा :
• आता कुणाकडूनही पूर्वीसारख्या गोष्टी लिहिल्या जात नाहीत. लिहिणाऱ्या हातांचा सराव थांबलाय. शब्द केविलवाणे होऊन फक्त वाऱ्यासारखे विरून जातात.

4. स्वमत :
• पूर्वीच्या काळातील कविता किंवा साहित्य उच्च सांस्कृतिक मूल्ये जपणारे होते. जीवनानुभूतीतून आदर्श व प्रेरणा जनमानसाला मिळत होत्या. परंतु आता लिहिणाऱ्या हातांतून सकस साहित्यनिर्मिती होत नाही, हे कवीला सांगायचे आहे. जो शब्दपसारा दिसतो तो भावनाशून्य व पोकळ आहे, असे कवीला म्हणायचे आहे. शाश्वत राहणारे अभिजात साहित्य निर्माण होत नाही, याची खंत व्यक्त करताना कवी म्हणतो की, आताचे शब्द केविलवाणे झाले आहेत व ते वाऱ्यावर विरून जात आहेत. आता लिहिल्या जाणाऱ्या शब्दांची नश्वरता व तात्कालिकता कवीला या ओळीतून सांगायची आहे.
View full question & answer
Question 28 Marks
1. आकलन कृती
(१) कोष्टक पूर्ण करा :
पूर्वीचे व्यवसाय पूर्वीचे खेळ
(१) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(२) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(३) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(१) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(२) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(३) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙

हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई

हरवत चाललाय किराणा आणि भुसार
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर
लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा
निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट
कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली
मागच्या धगीवर रटरटणारी आमटी
राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर

बोलाचालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली
सुटीत आता खेळत नाहीत मुलं
विटीदांडू आणि लगोऱ्या
थांबून गेलाय त्यांचा दंगा,
आट्यापाट्या आणि पिंगा
परकऱ्या मुली खेळत नाहीत आता
आधीचे मातीतले खेळ

पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर
बघत क्रिकेटची मॅच
आणि उलगडत क्राइम-थ्रिलर

लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते
शब्द बापुडे केवळ वारा
तसे विरून जातायत

मी वाचवतोय माझी कविता
आणि माझी आई
आणि माझी बोली
आणि माझी भूमी
कवितेसोबत

2. आकलन कृती
(१) शब्दजाल पूर्ण करा :
Image

3. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ
(१) पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा :
• हरवत चाललाय किराणा आणि भुसार
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर

4. स्वमत :
• तुम्हांला जाणवलेली कवीच्या मनातली खंत स्पष्ट करा.
Answer
1. आकलन कृती
(१) कोष्टक पूर्ण करा :
पूर्वीचे व्यवसाय पूर्वीचे खेळ
 (१) लोहारकाम
 (२) कुंभार (मडकी बनवणे)
 (१) विटीदांडू
 (२) लगोरी

2. आकलन कृती
(१) शब्दजाल पूर्ण करा :
(i) हाकेतून हद्द‌पार होत आहे.
(ii) हंबरायच्या थांबल्या आहेत.

3. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ
(१) पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा :
• बदलत चाललेल्या परिस्थितीचा आढावा घेताना कवी सतीश काळसेकर म्हणतात की, शहरात मोठमोठे मॉल व सुपरमार्केट निर्माण झाल्यामुळे पूर्वीची किराणामालाची व भुसाराची दुकाने भूतकाळात जमा झाली आहेत.

4. स्वमत :
• जुन्या जमान्यातील काही चांगल्या गोष्टी हरवत व दुरावत चालल्या आहेत, यांची खंत कवीला वाटते. बदलत चाललेल्या समाजातील वास्तव कवीच्या मनाला खटकते. आपण आपल्या आईला 'आई' अशी साद घालत नाही. वासरासाठी गोठ्यात गायही हंबरत नाही. मॉलच्या नवीन झगमगीत संस्कृतीमुळे किराणा व भुसार हरवत चालले आहेत. गावगाड्यातील व्यवसाय लोप पावताहेत. मुले मातीतले खेळ खेळत नाहीत. कुणी लेखन करीत नाही. मातृभाषेत कुणी या भूमीतली संस्कृती जपत नाही. अशा प्रकारे सांस्कृतिक वैभव नष्ट होण्याची खंत कवीला बोचते आहे.
View full question & answer