(१) पुढे दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा :
(१) विठ्ठल -˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(२) हृदय -˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(२) चौकटी पूर्ण करा :
(१) याचा बंदिखाना -˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(२) याचा मारा केला -˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
धरिला पंढरीचा चोर ।
गळां बांधोनियां दोर ।।१।।
हृदय बंदिखाना केला ।
आंत विठ्ठल कोंडिला ।।२।।
शब्दें केली जवाजुडी ।
विठ्ठल पायीं घातली बेडी ।।३।।
सोहं शब्दाचा मारा केला ।
विठ्ठल काकुलती आला ।।४।।
जनी म्हणे बा विठ्ठला ।
जीवें न सोडीं मी तुला ।।५।।
2. आकलन कृती :
(१) जोड्या लावा :
| 'ब' गट | 'ब' गट |
| (१) विठ्ठलाला धरले | अ) शब्दरचनेच्या जुळणीने |
| (२) विठ्ठल काकुलती आला | (आ) भक्तीच्या दोराने |
| (इ) 'तू म्हणजे मीच' या शब्दाने |
3. ओळींचा सरळ अर्थ :
• शब्दें केली जवाजुडी ।
विठ्ठल पायीं घातली बेडी | या ओळींतील सरळ अर्थ लिहा.
4. आकलन कृती :
• 'जनी म्हणे बा विठ्ठला। जीवें न सोडीं मी तुला ।।' या ओळींतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव स्पष्ट करा.


