Questions

इतिहास - परिच्छेदाचे वाचन - प्रश्नांची उत्तरे लिहा : [PARA QUE - 4]

Take a timed test

1 question · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 14 Marks
$\quad$१९७७ मध्ये भारत सरकारने 'जाल कूपर' हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. जाल कूपर हे 'टपाल तिकीट' या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कूपर यांनी 'इंडियाज स्टॅम्प जर्नल 'चे संपादन केले. भारतातील पहिल्या 'टपाल तिकीट संग्राहक ब्यूरो 'चे ते संस्थापक (First Philatelic Bureau) होत. त्यांनी 'एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटी 'ची स्थापना केली. पुढे या विषयावर त्यांनी पुस्तके लिहिली. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कूपर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन आहे.
प्रश्न :
(१) जाल कूपर यांनी कोणत्या क्षेत्रात मोठे योगदान दिले ?
(२) जाल कूपर यांच्या योगदानाचा भारत सरकारने कसा गौरव केला ?
(३) जाल कूपर यांनी कोणते कार्य केले ?
Answer
(१) जाल कूपर यांनी 'टपाल तिकीट' या क्षेत्रात मोठे योगदान दिले.
(२) जाल कूपर यांनी भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास व संग्रह यांबाबत केलेल्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने १९७७साली 'जाल कूपर' हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले.
(३) (१) 'इंडियाज स्टॅम्प जर्नल' या नियतकालिकाचे संपादन केले.
(२) 'एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटी'ची स्थापना केली.
(३) 'भारतीय टपाल तिकिटे' या विषयावर पुस्तके लिहिली, तसेच भारतीय तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेला.
(४) भारतातील पहिल्या 'टपाल तिकीट संग्राहक ब्यूरो 'चे ते संस्थापक होते.
View full question & answer