Questions

राज्यशास्त्र - पुढील संकल्पना स्पष्ट करा [SHORT NOT - 2]

Take a timed test

7 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 72 Marks
सिमला करार.
Answer
(१) १९७२ साली भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी व पाकिस्तानचे प्रधानमंत्री झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात 'सिमला करार' झाला.
(२) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष द्विपक्षीय पातळीवरच सोडवावेत, त्यात तिसऱ्या पक्षाला स्थान नको, ही भारताची भूमिका होती.
(३) याच तत्त्वावर १९७२ साली दोन्ही देशांत ' सिमला करार ' झाला.
(४) या कराराने भारत व पाकिस्तान यांच्यातील परस्पर देवाणघेवाणीसाठी एक नवा आराखडा तयार करण्यात आला. परंतु पुढे पाकिस्तानने या कराराचे पालन केले नाही.
View full question & answer