Question
पुढील संकल्पना स्पष्ट करा.

प्राच्यवादी इतिहासलेखन

Answer

  1. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना 'प्राच्यवादी अभ्यासक' असे म्हणतात.
  2. या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले.
    या लेखनाला 'प्राच्यवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
  3. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करून 'या भाषांची जननी प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती, अशी कल्पना मांडली.
  4. या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांना पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून भारताच्या इतिहासाचे लेखन केले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions