Question
'नागरीकरण' ही संकल्पना स्पष्ट करा.

Answer

(१) व्याख्या : थॉमसन वॉरन यांनी असे प्रतिपादन केले आहे की, "शासन, व्यापार, उत्पादन आणि तत्सम उपक्रम ज्या ठिकाणी होतात, त्या ठिकाणी कृषी व्यवसायाशी संलग्न असलेल्या लोकांनी स्थलांतरण करण्याची प्रक्रिया म्हणजे नागरीकरण होय."
(२) स्पष्टीकरण : एंडरसन यांनी असे प्रतिपादन केले आहे की, "ग्रामीण भागातील लोकांनी शहरी भागात स्थलांतरण करणे, कृषीविषयक व्यवसायांच्याऐवजी उद्योग, व्यापार व नोकरी या व्यवसायांचा स्वीकार करणे आणि त्यामुळे त्यांच्या पारंपरिक प्रवृत्ती, श्रद्धा, मूल्ये आणि वर्तनात होणारे परिवर्तन या समग्र प्रक्रियेस 'नागरीकरण' असे म्हणतात."
(३) औद्योगिकीकरण : नागरीकरणाच्या प्रक्रियेला १८व्या शतकाच्या उत्तरार्धात घडून आलेल्या औदयोगिकीकरणाने चालना दिली.
(४) भारतातील नागरीकरण : भारतात ही प्रक्रिया १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाली आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात त्यास वेग प्राप्त झाला.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा.
लवणस्तंभांची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते ?
व्यापाराच्या प्रकारांचे वर्गीकरण दर्शवणारा ओघतक्ता तयार करा.
शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते.
शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो. या समस्येवर उपाय सुचवा.
क्षेत्रभेटीच्या ठिकाणाची निवड करताना कोणती खबरदारी घ्यावी ?
वाहतुकीच्या मार्गाची व साधनांची निवड योग्य प्रकारे केल्यास कोणते फायदे होतात ?
आंतरराष्ट्रीय वाररेषा $१८०^{\circ}$ रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही ?
'नागरी क्षेत्र' म्हणजे काय ?
आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल ?