(१) आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत देशाच्या ग्रामीण भागात कारखाने, गिरण्या, ऊर्जाप्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प सुरू झाले. आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या गावांमध्ये कामासाठी येऊ लागल्याने गावाच्या लोकसंख्येत वाढ झाली.
(२) शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने शहरांच्या बाह्यवर्ती भागात उपनगरे विकसित झाली. लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सेवा व्यवसाय विकसित झाला.
(३) ग्रामपंचायतींची जागा नगरपरिषदेने, नगरपरिषदांची जागा नगरपालिकांनी आणि त्यांच्या जागी महानगरपालिका उदयास आल्या.
(४) अशा पद्धतीने लहान गावांचे महानगरात रूपांतर या स्वरूपात शहरांची वाढ होत गेल्याचे उदाहरण मुंबई शहर आहे.