Question
पुढील संकल्पना स्पष्ट करा.

प्रादेशिकता

Answer

  1. भारतात विविध भाषा बोलणारे, विविध परंपरा आणि संस्कृती असणारे लोक राहतात.
  2. भौगोलिक विविधतेबरोबरच साहित्य, शिक्षण, इतिहास, चळवळी यांबाबतीतही भारतात विविधता आढळते.
  3. प्रत्येकालाच आपली भाषा, परंपरा, संस्कृती यांच्याविषयी आत्मीयता वाटते. या आत्मीयतेतनच वरील सर्वांबाबत अस्मिता निर्माण होते. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा व तेथील साधनसामग्री व रोजगाराच्या संधी यांवर आपला हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिक अस्मिता जागृत होते.
  4. यातून आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधांचे जतन करणे या हेतूपायी काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष, विविध दबाव गट अस्तित्वात येतात, चळवळी निर्माण होतात.
  5. आपल्या प्रदेशाच्या हिताचे जतन करणे हा 'प्रादेशिकता' निर्मितीमागील मुख्य हेतू असतो. आपल्या भाषेच्या, प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात. यालाच 'प्रादेशिकता' असे म्हणतात.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free