Questions

भूगोल - स्पष्ट करा : [4M]

Take a timed test

6 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 14 Marks
दाबमुक्तीमुळे कायिक विदारण कशा प्रकारे घडून येते ?
Answer
खडकाच्या वरच्या थराचा खालच्या किंवा आतील थरांवर दाब असतो. खडकाच्या वरच्या थराचा दाब नाहीसा झाल्यामुळेही खडकाचा आतील किंवा खालचा थर ताणमुक्त होतो व त्यामुळे खडकाचे लहान-मोठे तुकडे होतात. अशा प्रकारे दाबमुक्तीमुळे कायिक विदारण घडून येते.
View full question & answer
Question 24 Marks
विदारण व खनन यांतील फरक स्पष्ट करा.
Answer
(१) नैसर्गिक घटकांचा खडकांवर परिणाम होऊन खडक फुटणे किंवा खडकांतील खनिजांचे विघटन होऊन खडक कमकुवत होणे म्हणजे 'विदारण / अपक्षय' होय.
(२) विदारण प्रक्रियेतून सुट्ट्या झालेल्या कणांची कणांची वारा, वाहते पाणी, हिमनदी, सागरी जल व भूजल यांच्या कार्यामुळे होणारी हालचाल, म्हणजे 'खनन' होय.
(३) कायिक विदारण, रासायनिक विदारण व जैविक विदारण हे विदारणाचे मुख्य प्रकार होत.
(४) वाऱ्यामुळे होणारे खनन, वाहत्या पाण्यामुळे होणारे खनन, हिमनदीमुळे होणारे खनन, सागरी जलामुळे होणारे खनन व भूजलामुळे होणारे खनन हे खननाचे मुख्य प्रकार होत.
View full question & answer
Question 34 Marks
विदारण व विस्तृत झीज यांतील फरक स्पष्ट करा.
Answer
(१) नैसगिन घटकांचा खडकांवर परिणाम होऊन खडक फुटणे किंवा खडकांतील खनिजांचे विघटन होऊन खडक कमकुवत होणे म्हणजे 'विदारण/अपक्षय' होय.
(२) विदारण प्रक्रियेतून सुट्ट्या झालेल्या कणांची केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणारी हालचाल, म्हणजे 'विस्तृत झीज' होय.
(३) कायिक विदारण, रासायनिक विदारण व जैविक विदारण हे विदारणाचे तीन मुख्य प्रकार होत.
(४) तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज व मंद गतीने होणारी विस्तृत झीज हे विस्तृत झीजेचे दोन मुख्य प्रकार होत.
View full question & answer
Question 44 Marks
जैविक विदारण कसे घडून येते ?
Answer
(१) जैविक विदारण मानव, प्राणी व वनस्पती या सजीवांकडून घडून येते.
(२) जुने किल्ले, जुन्या इमारती इत्यादी वास्तूंच्या भेगांमध्ये झाडांची मुळे वाढतात. त्यामुळे खडकांच्या कणांत ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतात.
(३) उंदीर, घुशी, ससे यांसारखे प्राणी व इतर कृमी-कीटक जमिनीत बिळे तयार करतात. मुंग्या वारूळ तयार करतात. या सर्व प्राण्यांना 'खनक प्राणी' म्हणतात. या प्राण्यांच्या खननामुळेही खडकांचे विदारण घडून येते.
(४) अनेकदा खडकांवर शेवाळे / हरिता, दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात. या वनस्पतींमुळेही खडकांचे विदारण घडते.
View full question & answer
Question 54 Marks
रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते ?
Answer
(१) रासायनिक प्रक्रियेमुळे खडकांचे रासायनिक गुणधर्म बदलून त्यांचे नैसर्गिक विघटन होणे, म्हणजे 'रासायनिक अपक्षय /विदारण' होय. कार्बनन, द्रवीकरण आणि भस्मीकरण हे रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार होत.
(२) पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत त्यात सौम्य कर्बाम्ल तयार होते. या प्रक्रियेस कार्बनन म्हणतात. कार्बनन प्रक्रियेमुळे चुनखडीसारखे पदार्थ सहज विरघळतात.
(३) मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळतात. या प्रक्रियेस द्रवीकरण म्हणतात. द्रवीकरणामुळे खडकांतील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात.
(४) खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्यामुळे लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. या प्रक्रियेस भस्मीकरण म्हणतात. या प्रक्रियेमुळे खडकाचे रासायनिक विदारण होते.
View full question & answer
Question 64 Marks
कायिक विदारण म्हणजे काय ?
Answer
(१) खडकांच्या रासायनिक स्वरूपात कोणतेही बदल न होता, खडकांचे फुटणे, तुटणे, खडकाचे भाग विलग होणे, म्हणजे 'कायिक विदारण' होय.
(२) अपपर्णन, कणात्मक विदारण व खंड-विखंडन या कायिक विदारणाच्या प्रक्रिया होत.
View full question & answer