Questions

राज्यशास्त्र - पुढील संकल्पना स्पष्ट करा [SHORT NOT - 2]

Take a timed test

9 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 12 Marks
क्योटो परिषद
Answer
(१) १९९७ मध्ये पर्यावरणाशी संबंधित एक आंतरराष्ट्रीय परिषद जपानमधील क्योटो शहरात घेण्यात आली.
(२) या परिषदेत पर्यावरणविषयक जो ठराव संमत करण्यात आला त्याला 'क्योटो प्रोटोकॉल' असे म्हणतात.
(३) या कराराने विकसित देशांना हवामान बदल रोखण्यासाठी मापदंड आखून दिले गेले.
(४) हे मापदंड या देशांना १५ वर्षांसाठी लागू होते.
View full question & answer
Question 22 Marks
पॅरिस परिषद
Answer
(१) ' हवामान बदल ' या विषयावर नोव्हेंबर २०१५ मध्ये पॅरिस येथे संयुक्त राष्ट्रांच्या सभासद राष्ट्रांची परिषद भरली होती.
(२) या परिषदेत सर्व राष्ट्रांनी हवामानात होणारे विघातक बदल रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असा निर्णय घेण्यात आला.
(३) तापमानात होणारी वाढ रोखण्यासाठी सर्व राष्ट्रांनी परस्परांशी सहकार्य करावे, असे ठरले.
(४) तापमानातील वाढ रोखण्याचे तंत्रज्ञान विकसित देशांनी विकसनशील देशांना देण्यासाठी मदत करावी, असे आवाहन या परिषदेत करण्यात आले.
View full question & answer
Question 32 Marks
रिओ पर्यावरण परिषद
Answer
(१) १९९२ मध्ये ब्राझीलमधील रिओ द जानीरो येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद घेण्यात आली.
(२) या परिषदेत ' शाश्वत विकास ' या संकल्पनेवर भर देण्यात आला.
(३) जैविक विविधता, जंगलांचे रक्षण अशा विविध विषयांवर करार करण्यात आले.
(४) हरितगृह वायूंमुळे होणाऱ्या वातावरणातील बदलांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली.
View full question & answer
Question 42 Marks
निर्वासित
Answer
(१) अनिच्छेने किंवा जबरदस्तीने ज्या व्यक्तींना आपली मातृभूमी सोडून दुसऱ्या राष्ट्रात सुरक्षिततेसाठी आश्रय घ्यावा लागतो, अशा लोकांना 'निर्वासित' असे म्हटले जाते.
(२) विविध कारणांमुळे लोक दुसऱ्या देशात निर्वासित म्हणून आश्रय घेतात -
(i) विशिष्ट वंश वा धर्म म्हणून छळ होत असलेले लोक.
(ii) देशातील जुलमी राजवटीला विरोध करीत असलेल्या व्यक्ती.
(iii) अंतर्गत युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तीत सापडलेले लोक.
View full question & answer
Question 52 Marks
मानवी हक्कांचा जाहीरनामा
Answer
(१) संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १० डिसेंबर १९४८ रोजी मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा संमत केला.
(२) या जाहीरनाम्यात एकूण ३० कलमे असून त्यात नागरी स्वातंत्र्य, समानता, राजकीय अधिकार इत्यादी हक्कांचा समावेश आहे.
(३) रोजगाराचा अधिकार, समान कामाला समान वेतन अशा आर्थिक अधिकारांचाही त्यात समावेश आहे.
(४) संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी आपल्या नागरिकांना हे मानवी हक्क दयावेत, अशी अपेक्षा त्यात व्यक्त केली आहे.
View full question & answer
Question 62 Marks
आंतरराष्ट्रीय समस्या
Answer
(१) संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना ' आंतरराष्ट्रीय समस्या ' असे म्हणतात.
(२) काही समस्या या स्थानिक असतात, तर काही समस्या या देशापुरत्या मर्यादित असतात.
(३) स्थानिक आणि राष्ट्रीय समस्या त्या राष्ट्रातील लोक आणि शासन सोडवत असते; तर
(४) आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी जगातील सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असते.
(५) गरिबी, निरक्षरता या राष्ट्रीय समस्या आहेत; तर दहशतवाद, पर्यावरण रक्षण या आंतरराष्ट्रीय समस्या आहेत.
View full question & answer
Question 72 Marks
दहशतवाद
Answer
(१) आपली आर्थिक आणि राजकीय उ‌द्दिष्टे साध्य करण्यासाठी हिंसेचा वापर करून समाजात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे, धमकी देणे या कृत्यांना ' दहशतवाद ' असे म्हणतात.
(२) दहशतवाद देशात असलेली सामाजिक आणि राजकीय व्यवस्था नाकारतो.
(३) दहशतवादाला भौगोलिक सीमांची मर्यादा नसते.
(४) दहशतवाद ही देशात संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा असते.
View full question & answer
Question 82 Marks
पर्यावरणीय न्हास
Answer
(१) औदयोगिकीकरणामुळे वातावरणात अशुद्ध वायू मिसळून प्रदूषण वाढले आहे.
(२) रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर; यामुळे दूषित अन्नपदार्थ खाण्यात येत आहेत.
(३) अणुऊर्जा भट्ट्यांमधून वातावरणात किरणोत्सर्जन होत आहे.
(४) वायू, ध्वनी आणि जल प्रदूषण वाढले आहे. वृक्षतोड होत आहे. या सर्वालाच ' पर्यावरणीय ऱ्हास ' असे म्हणतात. या पर्यावरणीय ऱ्हासाचे मानवी जीवनावर विघातक परिणाम होत आहेत.
View full question & answer
Question 92 Marks
मानवी हक्क
Answer
(१) माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारांना ' मानवी हक्क ' असे म्हणतात.
(२) मानवी हक्कांचा उगम नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेतून झाला आहे.
(३) मानवी हक्कांमध्ये जीविताचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश होतो.
(४) मानवी हक्क राज्यातील सर्व जनतेला मिळवून देण्याची जबाबदारी त्या राज्याच्या शासनाची असते.
View full question & answer