Chapter 11 जीवन गाणे (कविता) — मराठी STD 8 — Question
Maharashtra BoardEnglish MediumSTD 8मराठीChapter 11 जीवन गाणे (कविता)2 Marks
Question
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’ हा विचार स्पष्ट करा.
✓
Answer
निसर्ग ही एक मोठी शाळा आहे. त्याला भिंती नाहीत. बसायला बाक नाही की शाळेची घंटा ही येथे नाही. शिक्षक म्हणजे निसर्ग व निसर्गातील प्रत्येक घटक. तेच माणसाला अनेक गोष्टी शिकवून जातात. निसर्गातील लहानशा अशा मुंगीकडून एकाच रांगेने शिस्तीने जाण्याचे धडे घेता येतात. मधमाशीकडून सतत कार्यशील राहण्याचा धडा गिरवता येतो. झाडाकडून स्थितप्रज्ञता शिकता येते. कोणत्याही कठीण काळात नेटाने उभे राहणारे झाड आपले ‘गुरु’ होतात. नदीकडून अव्याहतपणे काम करण्याची प्रेरणा मिळते. नदी कधी थांबत नाही. प्रवाहशील असते. फुलांकडून सुगंध देणे म्हणजेच इतरांना सुखी कसे करावे, हे शिकता येते. पाण्याकडून निर्मळता शिकता येते. खरोखरच निसर्ग आपला गुरु आहे आणि असे हे बिनभिंतीच्या शाळेतले गुरु आपल्याला खूप गोष्टी शिकवतात.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.