आजकालची नवी पिढी ही आधुनिक विचारांनी भारलेली, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जगाच्या एक पाऊल पुढे टाकणारी अशी आहे. परंतु या पिढीला कोणत्याही गोष्टीची आत्मीयता दिसत नाही. आदर, मान, सन्मान अशा नैतिक मल्यांचा न्हास होताना दिसत आहे. अशा वातावरणात नव्या पिढीला पुन्हा एकदा ही कविता आपल्या गुरुजनांची शिकवण आठवण्यास भाग आपले मन, व्यक्तीत्व कसे विशाल करावे याचे भान कविता करून देते. नव्या पिढीची नवी स्वप्ने, नव्या आशा पूर्ण करायच्या असतील तर त्याला परिश्रम, अभ्यास करावाच लागेल असे ही कविता सांगते. शेवटी आधुनिक विचाराने भारलेले आपण सारा भेद मिटवून माणूसकी फक्त टिकवून ठेवू असे सांगते. म्हणून ही कविता मला आवडते.