Question
कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा.

Answer

१९९८ साली सुरू झालेल्या कोकण रेल्वेची पुढील वैशिष्ट्ये आहेत :
(१) या रेल्वेचा मार्ग ७६० किलोमीटर लांबीचा आणि चार राज्यांना जोडणारा आहे.
(२) या मार्गावर एकूण ९२ बोगदे असून त्यांतील करबुडे येथील ६.५ किलोमीटर लांबीचा सर्वांत मोठा बोगदा आहे.
(३) या मार्गावर १७९ मोठे व १८१९ छोटे पूल असून शरावती नदीवरील बांधलेला २०६५.८ मीटर लांबीचा पूल सर्वांत लांब आहे.
(४) रत्नागिरीजवळील पनवल नदीवरील ६४ मीटर उंचीचा सर्वांत उंच पूल आहे.
(५) दरडी कोसळणाऱ्या मार्गावर वेळीच धोका टाळण्यासाठी इंजिनामध्येच सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

जागतिकीकरणपूर्व कालखंडातील ग्रामीण व नागरी समाज यांच्या स्थितीची तुलना करा.
इतिहासलेखनात 'INDIA (भारत)' या वार्षिक संदर्भग्रंथाची उपयुक्तता स्पष्ट करा.
लालबहादूर शास्त्रींच्या राजवटीचे विशेष लिहा.
भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती ?
चित्रपटांचे बदलते स्वरूप वर्णन करा.
शेतीच्या विकासात कृषी विद्यालये/महाविद्यालये कोणती भूमिका बजावतात ?
भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात ?
संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे ?
'इन्सॅट-१ बी' या उपग्रहाचे भारताला कोणते फायदे झाले ?
भारतीय महिला आयोगाने कोणत्या मुद्द्यांच्या आधारे स्त्रियांच्या स्थितीचा अभ्यास केला ?