Questions

इतिहास - प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा [3M]

Take a timed test

12 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 13 Marks
पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे भारतीय शास्त्रज्ञांना कोणता आत्मविश्वास आला ?
Answer
रोहिणी-७५ हा अग्निबाण आणि पहिला उपग्रह आर्यभट्ट यांच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारतीय शास्त्रज्ञांना पुढील बाबतींत आत्मविश्वास आला :
(१) अंतरिक्षात सोडण्याजोग्या उपग्रहांची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते.
(२) भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे व उपग्रहाकडून आलेल्या संदेशांचे भूकेंद्रावर ग्रहण करणे, हे तंत्रज्ञान आपण विकसित करू शकतो.
(३) उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान आपल्याला अवगत होऊ शकते.
View full question & answer
Question 23 Marks
NPCIL कंपनी कोणत्या उद्दिष्टांसाठी स करण्यात आली ?
Answer
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) ही कंपनी पुढील उ‌द्दिष्टपूर्तीसाठी स्थापन करण्यात आली :
(१) विद्युतनिर्मिती करणे.
(२) सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर विद्युतनिर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणे.
(३) या तंत्रज्ञानाबाबत देशाला स्वावलंबी करणे.
View full question & answer
Question 33 Marks
दूरसंचार विभागाची कशा रितीने पुनर्रचना करण्यात आली ?
Answer
इसवी सन २००० मध्ये दूरसंचार विभागाची पुढीलप्रमाणे पुनर्रचना करण्यात आली :
(१) धोरणात्मक निर्णयांची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे कायम ठेवण्यात आली.
(२) ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवण्याकरिता भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ची स्थापना करण्यात आली.
(३) दूरध्वनी सेवेबरोबर सेल्युलर फोन, इंटरनेट ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध करण्यात आल्या.
View full question & answer
Question 43 Marks
भारताच्या दूरसंचार सेवेच्या प्रगतीची माहिती लिहा.
Answer
भारताने दूरसंचार सेवेत पुढील प्रगती केली आहे :
(१) १९७२ मध्ये मुंबईत 'ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिस'ची स्थापना होऊन आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेची व्यवस्था सुरू झाली.
(२) १९७६ मध्ये मुंबई व लंडन या दोन शहरांत थेट दूरध्वनी संपर्क साध्य करणारी ISD सेवा सुरू झाली.
(३) दूरध्वनीप्रमाणे टेलेक्स, टेलिप्रिंटर, रेडिओ छायाचित्रे अशा सेवा सुरू झाल्या.
(४) १९८६ मध्ये 'विदेश संचार निगम लिमिटेड (VSNL)' ही सेवा सुरू झाली.
(५) मोठ्या शहरांतील दूरसंचार सेवेसाठी MTNL ही कंपनी सुरू झाली.
(६) १९९० मध्ये VSNL ने भारतात इंटरनेट सेवा सुरू केली.
View full question & answer
Question 53 Marks
पोस्टाच्या 'पिनकोड' या पद्धतीची माहिती लिहा.
Answer
(१) टपाल वाटपात कार्यक्षमता आणण्यासाठी १५ ऑगस्ट १९७२ पासून भारतीय टपाल व तार विभागाने देशात सहा आकडी पोस्टल इंडेक्स कोड (पिनकोड) पद्धती चालू केली.
(२) या पद्धतीत देशाचे नऊ विभाग पाडण्यात आले.
(३) पिनकोडमधील पहिल्या क्रमांकाद्वारे मुख्य विभाग दर्शवला जातो.
(४) दुसरा क्रमांक उपविभाग दर्शवतो.
(५) तिसरा क्रमांक उपविभागातील मुख्य बटवडा जिल्हा दर्शवतो.
(६) उरलेले तीन क्रमांक स्थानिक बटवडा डाकघराची स्थाननिश्चिती करतात.
View full question & answer
Question 63 Marks
'इन्सॅट-१ बी' या उपग्रहाचे भारताला कोणते फायदे झाले ?
Answer
ऑगस्ट १९८३ मध्ये प्रक्षेपित झालेल्या 'इन्सॅट-१ बी' या उपग्रहाचे भारताला पुढील फायदे झाले -
(१) भारतातील २०७आकाशवाणी केंद्रे एकमेकांना जोडता आली.
(२) या यंत्रणेचा उपयोग जहाज किंवा विमान अपघातात सापडलेल्या आपद्ग्रस्तांचा शोध घेण्यासाठी होतो.
(३) हवामानाचा पूर्वअंदाज येतो.
(४) वादळांचा शोध व मागोवा घेता येतो.
(५) शैक्षणिक संस्थांना याचा उपयोग होतो.
(६) टेलिमेडिसीन ही सेवा मिळते; ज्यामुळे दुर्गम भागातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार सहज मिळू शकतो.
(७) ग्रामीण व छोट्या गावांतील वैद्यकीय केंद्रे मोठ्या शहरांतील सुपर स्पेशालिटी सेवा असलेल्या रुग्णालयांशी इन्सेंटद्वारा जोडली गेली आहेत.
(८) इन्सेंट सेवेचा दूरसंचार सेवेसाठी उपयोग होतो.
(९) दूरदर्शन, आकाशवाणी, मोबाइल या सेवांना उपयोग होतो.
(१०) हवामानाचा अंदाज व अंतरिक्ष विभाग या क्षेत्रांत उपयोग होतो.
View full question & answer
Question 73 Marks
क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करीदृष्ट्या कसा सुरक्षित झाला ?
Answer
(१) भारताने प्रथम पृथ्वी-१, २ व ३ ही १५० ते ३०० किलोमीटर अंतराचा पल्ला गाठणारी क्षेपणास्त्रे बनवली.
(२) त्यानंतर अग्नी-१, अग्नी-२ व अग्नी३ ही ७०० किलोमीटर एवढ्या अंतराचा पल्ला गाठणारी क्षेपणास्त्रे तयार केली.
(३) १९९० मध्ये ३० किलोमीटरचा पल्ला व ७२० किलोची विस्फोटके सुपरसॉनिक वेगाने नेणारे 'आकाश' हे क्षेपणास्त्र तयार केले.
(४) शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी 'नाग' हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले. अशा रितीने अधिकाधिक क्षमतेची क्षेपणास्त्रे निर्माण केल्यामुळे भारत लष्करीदृष्ट्या सुरक्षित झाला आहे.
View full question & answer
Question 83 Marks
'पृथ्वी' क्षेपणास्त्राविषयी माहिती लिहा.
Answer
(१) भारताने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) स्थापन करून क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केली.
(२) १९८८ मध्ये प्रथम 'पृथ्वी' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
(३) सध्या पृथ्वी-१ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र पायदळाकडे, पृथ्वी-२ हे वायुदलाकडे व पृथ्वी-३ हे नौदलाकडे आहे.
(४) पृथ्वी क्षेपणास्त्राची क्षमता पाचशे ते हजार किलो आण्विक विस्फोटके वाहून नेण्याची होती.
(५) आता पृथ्वी क्षेपणास्त्राला न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारा १५० ते ३०० किलोमीटर अंतराचा पल्ला साधणे शक्य झाले आहे.
(६) क्षेपणास्त्र निर्मितीत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा मोलाचा वाटा आहे.
View full question & answer
Question 93 Marks
अणुऊर्जा निर्मितीसंबंधात कोणते प्रकल्प सुरू झाले ?
Answer
(१) १९५६ मध्ये अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी 'अप्सरा' कार्यान्वित झाली.
(२) १९६९ मध्ये मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना झाली.
(३) वीजनिर्मितीसाठी थोरिअमचा उपयोग साध्य करण्यासाठी कल्पकम येथे 'रिएक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आले.
(४) अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने वडोदरा, तालचेर, तुतिकोरिन व कोटा या ठिकाणी उभारले गेले.
(५) जड पाण्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्यासाठी 'हेवी वॉटर प्रोजेक्टस्' या संस्थेची उभारणी करण्यात आली; याच संस्थेला नंतर 'हेवी वॉटर बोर्ड' असे नाव दिले गेले.
(६) १९८५ साली मुंबईजवळील तुर्भे येथे संपूर्ण भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली.
अशा रितीने अणुऊर्जा निर्मितीसंबंधात भारतभर अनेक प्रकल्प सुरू झाले.
View full question & answer
Question 103 Marks
कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा.
Answer
१९९८ साली सुरू झालेल्या कोकण रेल्वेची पुढील वैशिष्ट्ये आहेत :
(१) या रेल्वेचा मार्ग ७६० किलोमीटर लांबीचा आणि चार राज्यांना जोडणारा आहे.
(२) या मार्गावर एकूण ९२ बोगदे असून त्यांतील करबुडे येथील ६.५ किलोमीटर लांबीचा सर्वांत मोठा बोगदा आहे.
(३) या मार्गावर १७९ मोठे व १८१९ छोटे पूल असून शरावती नदीवरील बांधलेला २०६५.८ मीटर लांबीचा पूल सर्वांत लांब आहे.
(४) रत्नागिरीजवळील पनवल नदीवरील ६४ मीटर उंचीचा सर्वांत उंच पूल आहे.
(५) दरडी कोसळणाऱ्या मार्गावर वेळीच धोका टाळण्यासाठी इंजिनामध्येच सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.
View full question & answer
Question 113 Marks
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना 'मिसाईल मॅन' असे का संबोधले जाते ?
Answer
१९८३ नंतर संरक्षण संशोधन आणि विकास (DRDO) या संस्थेचे अध्यक्ष म्हणून डॉ. कलाम यांची निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली -
(१) 'पृथ्वी' आणि 'अग्नी' या क्षेपणास्त्रांच्या (मिसाईल्सच्या) यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या.
(२) इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅमअंतर्गत क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
(३) जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे बनवण्यात आली. असे बहुमोल योगदान देणाऱ्या व क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक असणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना 'मिसाईल मॅन' असे संबोधले जाते.
View full question & answer
Question 123 Marks
तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आहे ?
Answer
माझ्या वापरात असणाऱ्या पुढील सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आहे :
(१) मोबाइल (२) संगणक (३) रेडिओ (४) टी.व्ही. सेट.
या माध्यमांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर केलेला असल्याने मला दूरवरच्या व्यक्तीला पाहता येते, बोलता येते, ई-मेल वा फोटो पाठवता येतात. हवामानाचा अंदाज घेता येतो. माझ्या वापरात असणाऱ्या वर्तमानपत्रातील बातम्या याही उपग्रहाद्वारेच आलेल्या असतात.
View full question & answer