Question
पुढील बातमी वाचा :
Image

Answer

भावपूर्ण श्रद्धांजली

'अकोला शहरातील मेजर रमाकांत यांना कारगिल युद्धात लढताना वीरमरण आले, ही बातमी दूरदर्शनवर आम्ही ऐकली आणि आमच्या गावावर शोककळा पसरली. मेजरच्या घरी तर दुःखाला पारावार राहिला नाही. त्यांची पत्नी, आई-वडील सारेच शोकसागरात बुडून गेले. दोनच दिवसांनी शासकीय इतमामात पार्थिव आणले गेले. लाखो लोकांनी साश्रू नयनांनी त्यांना निरोप दिला.
दुसऱ्याच दिवशी आदर्श विद्यालयाच्या पटांगणात संध्याकाळी सहा वाजता मेजर रमाकांत यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. गेल्या दोन दिवसांतील गावाचे शोकमग्न रूप माझ्या तर सारखे डोळ्यांसमोर तरळत होते.
अनेकांनी त्यांच्या शौर्याचे आणि धैर्याचे कौतुक केले. 'शाळेचा तो उत्तम क्रीडापटू होता.' 'तो उत्तम नेतृत्वही करीत असे.' या व अशा त-हेच्या अनेक आठवणी सर्वांनी जागवल्या. आठवणी सांगताना प्रत्येकाचा गळा दाटून येत होता.
मेजर रमाकांत यांनी बालपणापासूनच सैनिक व्हायचे असे ठरवले होते. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या आई-वडिलांचा पाठिंबा होता. त्यामुळे ते नेहमी मैदानी खेळ खेळत. रोज सकाळी व्यायाम करीत. शेतातील कष्टाची कामे आवडीने करीत. गावातील मुलामुलींना व्यायाम, खेळ व पोहायला शिकवण्यात त्यांचा पुढाकार होता. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मेजरबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी मेजर यांच्या बलिदानाला पाणावलेल्या डोळ्यांनी अभिवादन केले. मेजर यांच्या कुटुंबीयांनी या प्रसंगाला धीराने तोंड दिले.
अशा त-हेचा प्रसंग मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. परंतु भविष्यात मला जमेल तसे देशसेवेचे व्रत अंगीकारायचे, असे मनाशी ठरवले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free