पुढील कृती सोडवा :
पुढील कृती सोडवा :
झाडे लावा, झाडे जगवा
वृक्षांची महती आपल्या भारतात प्राचीन काळापासून गाइली गेली आहे. तुकाराम महाराजांना तर वृक्ष हे आपले सगेसोयरे वाटतात. असे हे वृक्ष आज-या आधुनिक विज्ञानयुगातही मानवासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत.
वृक्ष आपल्याला सहस्र हातांनी मदत करतात. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तर ते भागवतातच; शिवाय आपल्या पूजाविधीसाठी नानाविध साहित्य देऊन आपल्याला सुखावतात. आज वनस्पतींपासून मिळालेल्या अनेक औषधांचा उपयोग करून माणसाने असाध्य आजारांवर मात केली आहे.
विज्ञानामुळे माणसाने खूप प्रगती केली पण या विकासासाठी माणसाने अविचाराने जंगलतोड केली. आपण आपल्या या वृक्षमित्राचा घात केल्याने स्वतःवरच दुष्काळाचे, प्रदूषणाचे संकट ओढवून घेत आहोत, याचा माणसाला विसर पडलेला आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. वृक्ष हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि 'प्राणवायू' हवेत सोडून हवा शुद्ध करण्याचे काम करतात. यामुळे माणसाचे जगणे सुकर व सुखी झाले आहे.
स्वतः जळून हे वृक्ष इतरांच्या उपयोगी पडतात. वृक्षाचा प्रत्येक अवयव माणूस, प्राणी, पक्षी यांना उपयुक्त आहे. वृक्षांजवळ भेदभाव नसतो. ते सर्वांना समान वागणूक देतात. अशा या वृक्षांची लागवड करणे आणि त्यांचे संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे. उशिरा का होईना, पण आपल्याला या संकटाची चाहूल लागली आहे. त्यामुळे 'झाडे लावा, झाडे जगवा' अशी जनजागृती सुरू झाली आहे. 'सामाजिक वनीकरणां 'सारखे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घेतले जात आहेत. या आणि यांसारख्या विविध प्रकल्पांना आपण सर्वांनीच हार्दिक साथ दिली, तर आपली वसुंधरा पुन्हा एकदा 'सुजलाम् सुफलाम्' व्हायला वेळ लागणार नाही.
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.