Question

पुढील कृती वाचा आणि लेखन करा:

Image

Answer

भ्रमणध्वनी नसते तर...!

       भ्रमणध्वनीबाबतची ती बातमी आठवली की, अजूनही थरकाप उडतो. भ्रमणध्वनीवर 'ब्लू व्हेल' खेळता खेळता एका शाळकरी मुलाने आत्महत्या केली. भ्रमणध्वनीवरून उगाच फोन करणे, वाईटसाईट संदेश पाठवणे वगैरे नीच कामे काही लोक करतातच. पण इतर अनेक दुष्परिणामही होताहेत. माणसे कामे सोडून भ्रमणध्वनीत गुरफटून जातात. किती दुरुपयोग सांगायचे! अतिरेकी लोक तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी भ्रमणध्वनींचा उपयोग करतात !
      असे हे भ्रमणध्वनी नसते, तर किती बरे झाले असते! भ्रमणध्वनींचा त्रास संपला असता. माणूस थोडा मोकळा झाला असता. स्वतःच्या संस्कृतीचा त्याने विचार केला असता. भ्रमणध्वनींचा त्रास आहे; पण त्याचे फायदेही अमाप आहेत. अनेकांनी व्यवसायासाठी व प्रचारासाठी फेसबुकचा व व्हॉट्सअॅपचा खूप उपयोग केला आहे.
      आपली कागदपत्रे, फोटो, व्हिडिओ हे सर्व आपण भ्रमणध्वनींमुळे जतन करून ठेवू शकतो. स्वतःच स्वतःचा चित्रपट तयार करू शकतो. नोकरीसाठी स्व-परिचय पत्र पाठवतो, तसे स्वतःच स्वतःची माहिती सांगत असल्याचा व्हिडिओ पाठवू शकतो. आता भ्रमणध्वनींमुळे आपण कोणाचेही पैसे कधीही, कुठेही, कोणत्याही क्षणी देऊ शकतो. आपली बँकेतील खाती आपण बँकेत न जाता वापरू शकतो. आपल्या दैनंदिन कामांसाठी, अभ्यासासाठी भ्रमणध्वनींचा प्रचंड उपयोग होत आहे. मुले तसा उपयोग करून घेतही आहेत.
     पूर्वी मात्र एवढी सुविधा नव्हती. पूर्वी संपर्क साधणे मुश्कीलच होई. तसेच, माहिती तंत्रज्ञान प्रगत नसल्याने सगळीच कामे संथगतीने चालत. आज हे चित्र पार बदलले आहे.
     भ्रमणध्वनींचा वाईट परिणाम हा तो वापर करणाऱ्यांमुळे घडतो. आपण वाईट गोष्टींना आळा घालू शकलो, तर भ्रमणध्वनींसारखी सुखकारक गोष्ट दुसरी नाही.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free