Question

पुढील कृतीनुसार पत्र लिहा

Image

Answer

दि. ५ नोव्हेंबर २०२२
प्रिय पूर्वजा,
सप्रेम नमस्कार.

मी मुद्दामच तुला पत्र लिहीत आहे. थोडा वेळ काढ नि हे माझे पत्र वाच.
ऐक ना ग, माझ्या वाचनात एक फार सुंदर पुस्तक आले आहे आणि ते तुला कळवावे म्हणून मुद्दाम हे पत्र लिहीत आहे.
या पुस्तकाचे नाव आहे, 'हात ना पसरू कधी' आणि लेखक आहेत रवींद्र देसाई. हेन्री व्हिस्काडींच्या 'Give us the tools' या पुस्तकाचे हे मराठी भाषांतर आहे. या पुस्तकातील हेन्रीचे चरित्र अत्यंत विलक्षण रोमांचकारक आहे. या हेन्रीला कमरेखाली पायच नाहीत. त्याला डॉक्टरांनी ॲल्युमिनियमचे पाय तयार करून दिले आहेत. पण या हेन्रीची जिद्द वाखाणण्याजोगी आहे; तुझ्या-माझ्यासारख्या सुदृढ माणसांना लाजवणारी आहे.
त्याने आयकर कार्यालयातील सुखासीन नोकरी सोडली आणि Ability नावाचा कारखाना काढला. त्यात स्वतःसारख्या अपंगांना नोकरी दिली.
त्या कामात त्याला अनंत अडचणी आल्या; पण हेन्रीची जिद्द हरपली नाही. 'Ability' या कारखान्यातील त्याची सर्व कामगिरी, सर्व
घटना या प्रचंड साहसाच्या आणि भरपूर प्रेरणा देणाऱ्या आहेत. हे पुस्तक तू अवश्य वाच. तू पुस्तक वाचल्यावर तुझा अभिप्राय कळव. मी वाट पाहत आहे. तुझ्या ती. स्व. आईबाबांना माझा साष्टांग नमस्कार सांग. तुझी मैत्रीण,
अदिती

अदिती माजलकर
११२/ब, सहकार कॉलनी,
वाडा, जिल्हा-पालघर,
ई-मेल: adim@xxxx.com

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free