(१) आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्राला ज्या उपाययोजना कराव्या लागतात, त्यालाच 'राष्ट्रीय हितसंबंध' असे म्हणतात.
(२) आपल्या राष्ट्राच्या फायद्याचे योग्य काय आहे, हे पाहून शासन निर्णय घेत असते, त्यालाच आपण 'राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना करणे' असे म्हणतो.
(३) देशाचा आर्थिक विकास होईल व सामर्थ्यही वाढेल, अशा निर्णयांचा समावेश राष्ट्रीय हितसंबंधांत होतो.
(४) देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडत्व यांचे रक्षण करणे ही बाबही राष्ट्रीय हितसंबंधांत जोपासली जाते.
(५) राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते.